बारामतीकरांनो पाणी जपून वापरा ! ‘या’ दिवसापासून पाणीपुरवठा होणार एक दिवसाआड
Updated On:

बारामती (प्रतिनिधी) – सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाले असून उपलब्ध पाणीसाठा मर्यादीत असल्याने पर्यायाने बारामती शहरासाठी पाणी पुरवठा एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाने कळविले आहे.
गुरुवार दि. ३०मे २०२४ रोजी संपूर्ण बारामती शहर व ग्रामीण भागात पाणी पुरवठा होईल व शुक्रवार दिनांक ३१ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा होणार नाही.
अशाप्रकारे निरा डावा कालव्याचे पुढील आवर्तन मिळेपर्यत एक दिवसाआड पाणी पुरवठा होईल याची सर्व नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.





