बारामतीचे पाणी फलटणमध्ये पेटले
Updated On:

फलटण : नीरा देवधरच्या लाभक्षेत्रातील पाणी पुन्हा बारामतीला वळवल्याच्या निषेधार्थ आज फलटण शहरातून नीरा देवधर पाणी संघर्ष समितीने निषेध मोर्चा काढला. क्रांतीसिंह नाना पाटील चौकातून या मोर्चाची सुरवात करण्यात आली.
नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखालील निघालेल्या या मोर्चाने फलटण, माळशिरस, खंडाळा तालुक्यातील जनतेला हक्काच पाणी मिळावे, या मागणीसाठी फलटण तहसीलदारांना निवेदन दिले.





