Baramati News | बारामती लोकन्यायालयात विक्रमी निकाल ; ५३४८ खटल्यांचा निकालात १० कोटींची वसुली!

प्रभात वृत्तसेवा
बारामती – बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दाखल पूर्व व दाखल खटल्यामध्ये तडजोड होऊन एकूण ५३४८ खटले निकाली निघाले असून एकूण १० कोटी ४६ लाख ९ हजार ५८७ रुपयांची वसुली झाली.बारामती जिल्हा न्यायालयाचे मुख्य जिल्हा न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विधी सेवा समिती व बारामती वकील संघटना अध्यक्ष ॲड प्रसाद खारतुडे व सदस्य वर्ग यांचे संयुक्त विद्यमाने हे लोकन्यायालय पार पडले.लोकन्यायालयासाठी आठ पॅनल करणेत आले होते.
जिल्हा न्यायाधीश १ श्री व्ही सी बर्डे, जिल्हा न्यायाधीश १ , एस. आर. पाटील, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर डी. एस. झंवर, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. टी. चिकने, श्रीमती व्ही. बी. पाटील, दिवाणी न्यायाधीश क स्तर पी. पी. काळे, न्या. व्ही. व्ही. देशमुख, न्या. श्रीमती टी. डी. इंगवले यांनी वकिलांसह पॅनल प्रमुख म्हणून काम केले.बारामती वकील संघटना अध्यक्ष ॲड. प्रसाद खारतुडे, उपाध्यक्ष ॲड. अनुप चौगुले, उपाध्यक्ष ॲड. हर्षदा जगदाळे, महिला प्रतिनिधी ॲड. मोनिका कोठावळे, ऍड. श्वेता वणवे, ऍड. विजय कांबळे, ॲड. बनसोडे यांच्यासह वकील संघटनेचे सदस्य यावेळी हजर होते. विधी सेवा समितीचे समन्वयक म्हणून मिलिंद देऊळगावकर यांनी काम पाहिले.
लोकन्यायालयात बँकेच्या वसुलीचे ४६१ खटले निकाली निघाले. त्यात ५ कोटी ९३ लाख ३८ हजार ९६५ रुपयांची वसुली झाली.मोटार अपघाताच्या २३ खटल्यामध्ये २ कोटी ३३ लाख ३९ हजार ६८३ रुपये नुकसान भरपाई पक्षकारांना मिळाली. बाकी पाणी वसुली, महावितरण वसुली, महसूल वसुली असे एकूण १० कोटी ४६ लाख ९ हजार ५८७ रुपयांची वसुली झाली आहे.वेळेचा सदुपयोग करून जास्तीत जास्त पक्षकारांनी तडजोडीमध्ये खटले मिटवल्याने पक्षकारांची वेळेबरोबर पैशाची देखील बचत होते. न्यायालयातील हेलपाटे वाचतात. त्यामुळे जास्तीत जास्त पक्षकारांनी तडजोडीने खटले मिळवावेत, असे मत बारामतीचे मुख्य जिल्हा न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी यावेळी व्यक्त केले.
मोटार अपघातात विमा कंपनीद्वारे मोठी भरपाई..
एचडीएफसी या विमा कंपनीद्वारे दोन प्रकरणांत एकूण ५८ लाख ५० हजार रुपये इतकी भरपाई देण्यात आली. एका प्रकरणात ॲड. प्रदीप द देशमुख यांनी एका पक्षकाराला २७ लाख २५ हजार नुकसान भरपाई मिळवून दिली. दोन्ही प्रकरणात विमा कंपनीद्वारे ॲड. विशाल बर्गे यांनी काम पाहिले. एचडीएफसी कंपनीच्या वतीने मंगेश इनामदार यांनी काम पाहिले. विमा प्रकरणे तडजोडीने मिटवल्यास पक्षकारांना होणारा विलंब टळतो व पैशाचा योग्य वेळी उपयोग होतो, असे मत विमा कंपनी सल्लागार ॲड. विशाल बर्गे यांनी व्यक्त केले.





