प्रभात वृत्तसेवा बारामती – प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत ऑगस्ट 2025मध्ये वाहतूक सुरक्षाविषयक नियमांच्या उल्लंघनप्रकरणी 799 वाहनांवर केलेल्या कारवाईत 1 हजार 504 एवढ्या विविध गुन्ह्यांत वाहनमालक वा वाहनचालकांकडून 56 लाख 25 हजार 250 रुपये इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे.यामध्ये अतिवेगाने धावणार्या वाहनांवर 305 गुन्हे, विना हेल्मेट वाहन चालविणे 162, सीट बेल्ट न लावणे 13, अवैध विमाप्रकरणी 229, क्षमतेपेक्षा अधिक वजन भरलेली वाहने 71, वाहन चालवितांना भ्रमणध्वनीचा वापर 26, रिफ्लेटर आणि टेल लॅम्प नसणे 53, दारु पिऊन वाहन चालवणे 13, ताडपत्री अच्छादन नसणे 16, काळी फिल्म लावणे 4, अनुज्ञाप्ती 132, वाहन परवाना 33, योग्यता प्रमाणपत्र 240, वायु प्रदुषण प्रमाणपत्र 207 असे एकूण 1 हजार 504 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत मोहीमस्तरावर वाहनांची तपासणीचे काम सुरु आहे. नागरिक तसेच शालेय विद्यार्थी वाहतूक करणार्यांना वाहनचालकांनी वाहतूक सुरक्षाविषयक नियमाचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे.