जळोची : बारामती तालुक्यातील पिंपळी लिमटेक येथील घरफोडी करत सुमारे अडीच लाख रुपयांचा सोन्या चांदीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. दरम्यान येथील किराणा दुकान व एक हार्डवेअरचे दुकान ही अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. दि.२० सप्टेंबर रोजी मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. याप्रकरणी तानाजी माणिकराव जाचक (वय ७०, वर्ष व्यवसाय शेती रा. पिपंळी लिमटेक, ता बारामती जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पिंपळी येथील फिर्यादी जाचक यांच्या शेजारी राहणाऱ्या चेतन सतीश बनसुडे यांचे किराणा दुकानाचे व विक्रात मालोजीराव जाचक यांचे हार्डवेअर दुकानाचे बंद दरावाज्याचे कुलुप कोणीतरी अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी सह्याने तोडुन आत प्रवेश करुन घरफोडी चोरी केली आहे. दि. २० रोजी रात्री ९ वाजल्यापासुन ते दि. २१ रोजी पहाटे ३ च्या दरम्यान फिर्यादीची आई शारदाबाई हिने फिर्यादीला जोरात ‘पापा पापा’ अशी हाक मारल्यानंतर फिर्यादीने तिच्याकडे गेले असता त्यावेळी तिच्या रुम मधील मागील बाजुचा दरवाज्या उघडा असलेला दिसल्यानंतर फिर्यादीने तिला काय झाले असे विचारले. असता तिने फिर्यादीस सांगितले की, माझे गोदरेजचे कपाट व लाकडी कपाटातील दागीने चोरी झाली आहे. फिर्यादीचे आईचे बंद दरवाज्याचे कुलुप कशाने तरी तोडुन आत प्रवेश करुन घरफोडी करून करून चोरी केली. या चोरीच्या घटनेत जाचक यांच्या घराची घरफोडी करत चोरट्यांनी घरातील २५ हजार किमंतीच्या १ तोळे वजनाच्या सोन्याच्या ४ अंगट्या, १२ हजार ५०० किमंतीच्या अर्धा तोळे वजनाचे ४ कानातील सोन्याचे कुडे असलेले जुने २५ वर्षापुर्वीचे १ लाख २५ हजार किमंतीचे ५ तोळे वजनाचे गळ्यातील सोन्याचा हार, असलेले जुने २५ वर्षे पुर्वीचे २५ हजार किमंतीचे १ तोळा वजनाचे लहान मोठे सोन्याचे दागीने असलेले जुने २५ वर्षापुर्वीचे ५० हजार किमंतीचे सोन्यात आठलेला २ तोळे वजनाचा हार जुने २५ वर्षापुर्वीचे २० हजार किमंतीची अर्धा किलो वजनाचे चांदीची समई व अर्धा किलो तामन, असे एकूण यामध्ये २ लाख ५७ हजार ५०० रुपयांची चोरी झाली.