प्रभात वृत्तसेवा बारामती – शासकीय कर्मचारी यांच्या सरकारी कामात अडथळा आणून त्यास मारहाण केल्याबद्दल आरोपीस 2 वर्षे सक्त मजुरी 5 हजार रुपये दंडाची शिक्षा येथील मे. जिल्हा न्यायाधीश हितेंद्र अनिलकुमार वाणी यांनी सुनावली.आरोपी किरण लक्ष्मण खराडे व आकाश कैलास ताकवणे (रा. हिंगणीगाडा ता. दौंड) यांना शासकीय कामात अडथळा आणून मारहाण व धमकी दिल्याबद्दल आरोपीस 2 वर्षे सक्त मजुरी 5 हजार रूपये व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 4 जानेवारी 2023 रोजी आरोपी यांनी फिर्यादी वासुंदे गावचे तलाठी बाळासाहेब हरिशचंद्र चव्हाण हे शासकीय काम करत असताना व शासकीय काम घेऊन एसटी स्टॅण्डकडून मंडल अधिकारी पाटस यांच्याकडे जात होते. आरोपी किरण लक्ष्मण खराडे व आकाश कैलास ताकवणे यांनी लोकसेवक तलाठी यांना सरकारी कामात मारहाण केल्याप्रकरणी व शासकीय कामात अडथळा आणल्यामुळे यवत पोलीस स्टेशनला गु. र. नं 13/2023 अन्वये फिर्यादी यांनी फिर्याद दाखल केली. गुन्ह्यााचा तपास तात्कालीन सहायक पोलीस निरिक्षक केशव वाबळे यांनी करुन कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते. या केसमध्ये फिर्यादी पक्षातर्फे फिर्यादी, पंच, साक्षीदार व तपासी अधिकारी यांची साथ नोंदविली केसमध्ये सरकार पक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता विकास घनवट यांनी काम पाहिले. त्यांचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरुन शासकीय कर्मचार्यास अडथळा आणून मारहाण केल्याबद्दल दोन्ही आरोपींना वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व 5000/- तसेच धमकी दिल्याबद्दल किरण लक्ष्मण खराडे याला 1 वर्षे सश्रम कारावासाची व 2 हजार रूपये दंड शिक्षा सुनवली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोरख के. कसपटे यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. तसेच त्यास हवालदार वेनूनाद डोपरे यांनी मोलाचे सहकार्य केले.