Baramati Byelection : बारामती पोटनिवडणुकीतून शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांची माघार; पण 23 उमेदवार रिंगणात कायम
Baramati Byelection: बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह...

Baramati Byelection : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी घडामोड झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेससह तब्बल 30 उमेदवारांनी माघार घेतली असून आता एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर ही निवडणूक होत आहे.
काँग्रेसने या निवडणुकीतून अधिकृत माघार घेतल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी फोनवरून विनंती केली होती, तसेच आमदार रोहित पवार यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. याशिवाय शरद पवार यांच्या सूचनेचाही विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी पार्थ पवार यांच्या वक्तव्यावरून कान टोचले.
काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी अर्ज मागे घेतला आहे. एकूण 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 30 जणांनी माघार घेतल्याने 23 उमेदवार अंतिम टप्प्यात उरले आहेत. गुरुवारी 6 जणांनी माघार घेतल्यानंतर शुक्रवारी आणखी 24 जणांनी अर्ज मागे घेतले.

Baramati Byelection : बारामती पोटनिवडणुकीतून शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांची माघार; पण 23 उमेदवार रिंगणात कायम
दरम्यान, ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले आणि करुणा मुंडे-शर्मा यांनी अर्ज कायम ठेवला आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोघेही बारामतीत न आल्याने त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले असून ते निवडणूक लढवणार आहेत. या पोटनिवडणुकीसाठी मतदान 23 एप्रिल रोजी होणार असून मतमोजणी 4 मे रोजी होईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 6 मेपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
निवडणूक कार्यक्रम – Baramati Byelection
अधिसूचना जारी : 30 मार्च 2026
अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026
अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026
अर्ज माघारीची अंतिम मुदत : 9 एप्रिल 2026
मतदान : 23 एप्रिल 2026
मतमोजणी : 4 मे 2026
प्रक्रिया पूर्ण : 6 मे 2026
दरम्यान, बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, अशोक चव्हाण आदी प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. Baramati Byelection





