Baramati Accident : बारामतीत भीषण अपघात! सख्या भावांच्या दुचाकीला ट्रकची धडक; एकाचा जागीच मृत्यू, थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
Baramati Accident : बारामती तालुक्यातील सुपे-चौफुला मार्गावरील अहिल्याबाई चौकात एक अत्यंत हृदयद्रावक आणि थरारक अपघात घडला आहे.

Baramati Accident : बारामती तालुक्यातील सुपे-चौफुला मार्गावरील अहिल्याबाई चौकात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सख्खा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. मालवाहू ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Baramati Accident)
या अपघातात सोमनाथ दत्तात्रय ठोंबरे (रा. शेंडगेवाडा, सुपे, ता. बारामती) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे सख्खे भाऊ शुभम दत्तात्रय ठोंबरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. (Baramati Accident)
माहितीनुसार, दोन्ही भाऊ मोरगाव येथील शाळेतून दुचाकीवरून आपल्या सुपे येथील घरी परतत होते. अहिल्याबाई चौकात वळण घेत असताना दुचाकीचा तोल जाऊन ती घसरली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रक (एमएच 10 सीआर 4199) जवळ आल्याने दुचाकी ट्रकच्या चाकाखाली गेली आणि भीषण अपघात झाला. (Baramati Accident)
या अपघातात सोमनाथ ठोंबरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर शुभम ठोंबरे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सुपे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत घटनास्थळाचा पंचनामा केला. (Baramati Accident)
बारामती तालुक्यातील सुपे गावात अपघात,दोन सख्ख्या भावांची दुचाकी ट्रकखाली गेली, एकाच्या जागीच मृत्यू; दुसरा गंभीर pic.twitter.com/rcEnjEig0H
— Akshay Shitole (@AkshayShitole21) July 26, 2026
या प्रकरणाचा पुढील तपास सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, घरातील तरुण मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याने ठोंबरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Baramati Accident)
Baramati Accident : काळजाचा थरकाप! बारामती-पारवडी मार्गावर भीषण अपघात; मायलेकींचा जागीच मृत्यू
ST Bus Accident : एसटी बसचा भीषण अपघात! पहाटेच्या सुमारास घडली थरारक घटना; ४४ प्रवाशांचा काय झालं?





