बारामती : सावित्री संस्थेकडून अनोखा प्रोत्साहनपर सन्मान

पिंपळी लिमटेकच्या उपसरपंचपदी अश्विनी बनसोडे यांची निवड
बारामती – पिंपळीच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल अश्विनी सुनील बनसोडे यांचा सावित्री महिला प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. महिला उपसरपंच यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेत सावित्री महिला प्रशिक्षण संस्थेने शाल व पुष्पगुच्छ आणि रोप भेट देऊन अश्विनी बनसोडे यांचा सन्मान केला.
पिंपळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हा सन्मान सोहळा पार पडला. सावित्री महिला प्रशिक्षण संस्थाच्या अध्यक्षा स्नेहा अविनाश थोरात व संस्थेच्या पदाधिकारी यांच्या वतीने सोहळ्याच्या आयोजन केले होते. नवनिर्वाचित उपसरपंच अश्विनी बनसोडे यांचे महिलांसाठीचे कार्य मोलाचे आहे. त्यांनी ग्रामपंचायत सदस्य काळात महिलांसाठी अनेक शासकीय योजना व आरोग्यविषयक तसेच बचतगटांसाठी कर्जनुदान इतर उपक्रम राबविले आहे. आता उपसरपंच निवडीनंतर त्या अधिक जोमाने कार्य करतील, असा विश्वास संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा थोरात यांनी व्यक्त केला.
सरपंच मंगल केसकर व ग्रामपंचायत सदस्या स्वाती अशोक ढवाण पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच मंगल केसकर व सदस्या स्वाती ढवाण पाटील यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा थोरात यांचा देखील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्षा पूनम थोरात, सदस्या मानिनी थोरात, नम्रता बनसोडे, सुरेखा देवकाते पाटील, बेगम इनामदार, पूजा थोरात, बेबी खोमणे, सारिका थोरात, मनीषा गायकवाड, कोमल पवार, मयुरी गायकवाड, रुचिता थोरात, माजी उपसरपंच आबासाहेब देवकाते, उद्योजक बाळासाहेब मदने, हरिभाऊ केसकर, बारामती संजय गांधी योजनेचे माजी सदस्य सुनील बनसोडे उपस्थित होते.
हा सन्मान,समस्त महिलांचा
उपसरपंच बनसोडे म्हणाल्या की, हा सन्मान माझा नसून गावातील समस्त महिला भगिनींचा आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर, छत्रपतीचे संचालक संतोष ढवाण पाटील व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिला तसेच गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.





