Marathi celebrities : मराठी सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा! कुणी कसं केलं स्वागत? पाहा Video…

Marathi celebrities : आज संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बाप्पांचं आगमन होत आहे. या आगमन सोहळ्यामुळे भक्तीमय वातावरण ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. गणपती बप्पा मोरयाचा जयघोष केला जात आहे. यामुळे एकप्रकारचं भक्तीमय वातावरण तयार झालं आहे.
खरंतर मराठी सेलिब्रिटींनीच्या घरी देखील लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या धूम धडाक्यात सेलिब्रिटींनी आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं आहे. मराठी कलाकारांनी बाप्पाच्या आगमन सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेता विवेक सांगळेच्या घरी लाडक्या बाप्पाचं स्वागत मोठ्या थाट्यात करण्यात आलं आहे. यावेळी त्याने ढोल ताश्याच्या गजरात घरात बाप्पाची मूर्ती विराजमान केली आहे. यावेळी त्याचं संपूर्ण कुटुंब देखील तिथे उपस्थित होतं.
View this post on Instagram
अनेक मालिकांमधून टेलिव्हिजन विश्वात नावाजलेली अभिनेत्री रुपाली भोसले हिच्या घरी सुद्धा बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. यावेळी तिने बाप्पासाठी सुंदर फुलांची आरास तयार केली आहे.
View this post on Instagram
अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी देखील बाप्पाचं आगमन मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आलं आहे. यावेळी त्याचा लूक पारंपारिक पद्धतीचा होता. डोक्यावर पांढरी टोपी त्याने परिधान केली होती. यावेळी बाप्पाचं औक्षण करुन घरात स्वागत आलं.
View this post on Instagram
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सुद्धा भावासोबत मिळून बाप्पाची मुर्ती घडवली आहे. बाप्पाची मुर्ती तयार करतानाचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. चाहत्यांना तिचा हा व्हिडिओ प्रचंड आवडला आहे. यावर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत.





