बन्सुरी स्वराज यांंना गृह मंत्रालयाने सोपवली मोठी जबाबदारी

Bansuri Swaraj| नवी दिल्ली लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार बन्सुरी स्वराज यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने काल यासाठी आवश्यक राजपत्र अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर आता खासदार बन्सुरी स्वराज यांना नवी दिल्ली नगरपरिषद (NDMC) चे सदस्य बनवण्यात आले आहे.
बन्सुरी स्वराज यांनी गुरुवारी एनडीएमसीचे सदस्य आणि दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. नरेश कुमार यांनी एनडीएमसीच्या अध्यक्षपदाची शपथ घेऊन अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. दरम्यान, 3 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने भाजप खासदार बन्सुरी स्वराज यांची NDMC सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
आज NDMC सदस्य के रूप में शपथ ग्रहण की और @tweetndmc परिषद की बैठक में भाग लिया।
इस अवसर पर दिल्ली के मुख्य सचिव श्री @iasnkumar जी ने NDMC के चेयरमैन पद की शपथ लेकर अतिरिक्त प्रभार ग्रहण किया। इस दौरान वाइस चेयरमैन श्री @upadhyaysbjp जी उपस्थित रहे।@BJP4Delhi @BJP4India pic.twitter.com/IosbiNq3Y3
— Bansuri Swaraj (@BansuriSwaraj) July 3, 2024
बन्सुरी यांनी त्यांच्या एक्स हँडलवर फोटो शेअर करत लिहिले की, ‘आज एनडीएमसी सदस्य म्हणून शपथ घेतली आणि एनडीएमसी कौन्सिलच्या बैठकीत सहभागी झाले. यावेळी दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी एनडीएमसीच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली आणि अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. यावेळी उपाध्यक्ष सतीश उपाध्याय उपस्थित होते.’
कोण आहेत बन्सुरी स्वराज?
बन्सुरी स्वराज या माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या आहेत. बन्सुरी हे वॉरविक विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे पदवीधर आहेत. त्या पेशाने वकील आहेत. बन्सुरी स्वराज यांना आधी भाजपकडून कायदेशीर सेलचे सहसंयोजक म्हणून जबाबदारी दिली होती.
त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि लोकसभा निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहे. या निवडणुकीत बन्सुरी स्वराज यांच्याविरोधात आम आदमी पक्षाकडून सोमनाथ भारती यांनी उमेदवारी देण्यात आली होती.
हेही वाचा:





