मार्च महिन्यात सलग ४ दिवस बँका राहणार बंद; ‘या’ दिवशी बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

Bank Employee Strike | मार्च महिन्यात तुमची बँकेशी निगडीत काही कामे राहिली असतील तर लवकरात लवकर करून घ्या. कारण सलग चार दिवस बँक बंद असणार आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनुसार, 24 आणि 25 मार्च रोजी देशभरातील 9 बँका संपावर जाणार आहेत. तर 22 मार्चला चौथा शनिवार आणि 23 मार्चला रविवार असल्याने बँका सलग 4 दिवस बंद राहणार आहेत.
विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स 24 आणि 25 मार्च रोजी 2 दिवसांच्या देशव्यापी संपावर ठाम आहेत. कर्मचारी संघटनेच्या प्रमुख मागण्यांबाबत इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) सोबत बैठक झाली होती. मात्र, यात कोणताही तोडगा निघाला नसल्याने संघटना आंदोलन करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
IBA सोबतच्या बैठकीत, UFBU सदस्यांनी सर्व कॅडरमध्ये भरती आणि पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्यासह अनेक मुद्दे उपस्थित केले. बैठक होऊनही प्रमुख समस्यांचे निराकरण झालेले नाही. दरम्यान. नऊ बँक कर्मचारी संघटनांच्या युनिफाइड बॉडी यूएफबीयूने या मागण्यांसाठी यापूर्वी संपाची घोषणा केली होती. मात्र प्रमुख मागण्यांवर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे आता सलग चार दिवस बँका बंद राहिल्याने देशाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
कोणत्या मागण्यांसाठी संप पुकारला?
- सरकारी बँकांमधील रिक्त पदे भरावे .
- कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पदांवर तातडीने नियुक्त्या करण्यात याव्यात.
- कार्यप्रदर्शन पुनरावलोकन आणि प्रोत्साहन योजना मागे घ्याव्यात.
- डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस (DFS) ने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे नोकरीची सुरक्षा धोक्यात आल्याचे युनियन्सचे म्हणणे आहे.
- बँकांच्या कामकाजात ‘मायक्रो-मॅनेजमेंट’ वर बंदी घालावी. UFBUने आरोप केला आहे की सरकारी बँक मंडळांच्या स्वायत्ततेवर परिणाम होत आहे.
- ग्रॅच्युइटी कायद्यात सुधारणा: ही मर्यादा ₹ 25 लाखांपर्यंत वाढवली जावी, जेणेकरून ती सरकारी कर्मचाऱ्यांच्या योजनेच्या बरोबरीने असेल आणि त्याला आयकरातून सूट मिळेल.
- आयबीएशी संबंधित उर्वरित प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत.
त्यामुळे, जरतुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास ते 22 मार्चपूर्वी पूर्ण करा. सलग चार दिवस बँका बंद राहिल्याने व्यावसायिकांसह सरकारी तसेच सर्वसामान्यांचे काम विस्कळीत होणार आहे. Bank Employee Strike |
हेही वाचा :
‘मुस्लिम समाजातून अधिक IAS-IPS अधिकारी झाले तर…’, नितीन गडकरींच्या वक्तव्याची जोरदार चर्चा





