नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात तब्बल ‘इतके’ दिवस राहणार बँका बंद; सुट्ट्यांची यादी एकदा पाहा

Bank Holidays in January 2025 | नवीन वर्ष अवघ्या काही दिवसात सुरू होणार आहे. मात्र, 1 जानेवारी 2025 पासून अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहे. याशिवाय जानेवारी महिन्यात तुम्ही बँकेशी संबंधित काही महत्त्वाची कामे करणार असाल, तर त्यापूर्वी सुट्ट्यांची यादी तपासून घ्या.
जानेवारी महिन्यात बँकांना एकूण 15 दिवस सुट्टी आहेत. यामध्ये प्रत्येक आठवड्यातील दुसरा आणि चौथा शनिवार तसेच साप्ताहिक सुट्टी रविवारचा समावेश असणार आहे.
जानेवारी 2025 मधील सुट्ट्यांची यादी खालीलप्रमाणे –
1 जानेवारी- नववर्ष/ देशातील बहुतांश राज्यात बँका बंद
5 जानेवारी- रविवार
11 जानेवारी- दुसरा शनिवार
12 जानेवारी- रविवार/ स्वामी विवेकानंद जयंती
14 जानेवारी- मकर संक्रांत/ पोंगल निमित्तानं आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणामध्ये बँका बंद
15 जानेवारी – तिरुवल्लुवर दिवस, माघ बिहू आणि संक्रांतीनिमित्त तामिळनाडू, आसाम आणि इतर राज्यांमध्ये बँका बंद
16 जानेवारी – उज्जावर तिरुनल/ तामिळनाडूतील बँका बंद
19 जानेवारी – रविवार
22 जानेवारी- इमोइन/ मणिपूरमध्ये बँकांना रजा
23 जानेवारी- नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती/ मणिपुर, ओडिशा, पंजाब, सिक्किम, पश्चिम बंगाल, जम्मू-कश्मीर आणि दिल्ली
25 जानेवारी- चौथा शनिवार
26 जानेवारी- प्रजासत्ताक दिन
30 जानेवारी – सोनम लोसर/ सिक्किममध्ये रजा
दरम्यान, जानेवारी 2025 मध्ये भारतातील विविध भागात हे प्रमुख सण साजरे केले जातील. त्यानुसार विविध राज्यातील काही बँकांना सुट्टी राहणार आहे. सुट्टीच्या काळात बँकिंग कामकाजावर परिणाम होऊ शकतो. परिणामी, तुमच्या जवळच्या बँक कार्यालयात या सुट्ट्यांची खात्री करा आणि त्यानुसार तुमचे काम व्यवस्थापित करा. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. Bank Holidays in January 2025 |
मात्र बँकेची सुट्टी असली तरी व्यवहार करण्यासाठी तुम्ही UPI, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरू शकता. याशिवाय एटीएममधूनही पैसे काढता येतात.
हेही वाचा:





