Bank Holidays : बँकेची कामं झटपट आटपा… ‘फेब्रुवारी’मध्ये तब्बल ‘इतक्या’ दिवस असणार बँकांना सुट्टी !

Bank Holidays in February 2025 : वर्षाचा पहिला महिना जानेवारी लवकरच संपणार असून, फेब्रुवारी सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल, तर फेब्रुवारीमधील सुट्ट्यांची यादी आजच तपासून घ्या, अन्यथा तुम्हाला भारी नुकसान होऊ शकते.
नुकतंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं फेब्रुवारी महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार याची यादी जारी केली आहे. त्यामुळे बँकांचं कामकाज किती दिवस सुरु असेल, कोणत्या दिवशी सुट्टी असेल यावर एक नजर टाकुयात….
फेब्रुवारीमध्ये 14 दिवस बँका बंद राहणार आहे :
फेब्रुवारी 2024 मध्ये एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. विविध राज्यांमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद असतील हे तुम्ही पाहू शकता. याशिवाय रविवार आणि दुसऱ्या अन् चौथ्या शनिवारी बँकेच्या कामकाजाला सुट्टी देखील असते.
फेब्रुवारीमधील सु्ट्ट्यांची यादी :
3 फेब्रुवारी (सोमवार) : सरस्वती पूजनाच्या निमित्तानं अगरताळामध्ये बँक बंद राहील.
11 फेब्रुवारी (मंगळवार) : थाई पूसामच्या निमित्तानं चेन्नईत बँका बंद असतील.
12 फेब्रुवारी(बुधवार) : श्री रविदास जयंती निमित्तानं शिमला येथे बँका बंद असतील.
15 फेब्रुवारी (शनिवार) : लुई-नगाई-नी निमित्तानं इम्फाळमध्ये बँकांना सुट्टी असेल.
19 फेब्रुवारी (बुधवार) : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बेलापूर, मुंबई, नागपूरमध्ये बँकांना सुट्टी राहील.
20 फेब्रुवारी (गुरुवार) : अरुणाचल प्रदेश, मिझोरम राज्य स्थापना दिनानिमित्त ऐझवाल, इटानगरमध्ये बँका बंद असतील.
26 फेब्रुवारी (बुधवार ): महाशिवरात्रीनिमित्त अहमदाबाद, ऐझवाल, बंगळुरु, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर, तिरुअनंतपुरम मध्ये बँका बंद असतील.
28 फेब्रुवारी (शुक्रवार) : लोसार निमित्त गंगटोकला बँका बंद असतील.
साप्ताहिक सुट्टीनिमित्त बँका बंद राहणार :
2 फेब्रुवारीला रविवारनिमित्त साप्ताहिक सुट्टी असेल.
8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारीला दुसरा शनिवार अन् रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल.
16 फेब्रुवारीला रविवारनिमित्त साप्ताहिक सुट्टी असेल.
22 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारीला चौथ्या शनिवार अन् रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल.





