लीबियाच्या किनाऱ्याजवळ बांगलादेशी शरणार्थ्यांची बोट बुडाली; २० जणांचे मृतदेह सापडले

अंकारा – इटलीला पोहोचण्याच्या प्रयत्नात बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक बोट उलटल्यानंतर लिबियाच्या किनाऱ्यावरील भूमध्य समुद्रातून किमान २० जणांचे मृतदेह सापडले आहेत. हे सर्व शरणार्थी बांगलादेशी नागरिक असल्याचे मानले जाते आहे.
त्यांच्याकडे कोणतेही ओळखपत्र सापडले नाही, मात्र मरण पावलेले बांगलादेशी होते, असे दफनविधीची हाताळणी करणाऱ्या रेड क्रेसेंटला वाटते आहे, असे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. शुक्रवारी लिबियातील ब्रेगापासून सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या अजदाबिया येथे या सर्व मृतदेहांना दफन करण्यात आले, असे मंत्रालयाने सांगितले.
मरण पावलेल्या व्यक्तया मानवी तस्करी करणाऱ्या गटाचा भाग होत्या. चांगल्या संधींच्या शोधात लिबिया ते इटलीचा धोकादायक प्रवास सुरू केला होता. भूमध्य समुद्रात बोट बुडाली आणि पूर्व लिबियातील ब्रेगा या किनारी शहराजवळ मृतदेह किनाऱ्यावर वाहून आले, असे माध्यमांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी, ३० जानेवारी रोजी, लिबियातील बांगलादेश दूतावासाने एक निवेदन जारी करून लिबियातील ब्रेगा येथे किनाऱ्यावर अनेक मृतदेह वाहून आल्याच्या वृत्तांवर चिंता व्यक्त केली. बळी पडलेले लोक बेकायदेशीर स्थलांतरित होते, असे स्थानिक अधिकारी मानत आहेत.





