“बांगलादेशला जाऊ नका…” ; हिंसाचारानंतर भारत सतर्क, नागरिकांसाठी सूचना जारी

Bangladesh Violence । बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. परिणामी हिंसक संघर्षात आतापर्यंत ९७ लोकांचा मृत्यू झालाय. तर डझनभर जखमी झाले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आंदोलक आणि सत्ताधारी अवामी लीगच्या समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षात 14 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतानेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. रविवारी रात्री भारताने बांगलादेशमध्ये उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांसाठी एक ॲडव्हायझरी जारी केली. हिंसाचारग्रस्त देशात नागरिकांना सावधगिरी बाळगण्यास आणि त्यांच्या बांगलादेशात जाणे टाळावे असे सांगण्यात आले आहे. ॲडव्हायझरीमध्ये नागरिकांना पुढील आदेश मिळेपर्यंत बांगलादेशला जाणे टाळण्यास सांगितले आहे. नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.
भारताने नागरिकांना काय सल्ला दिला आहे? Bangladesh Violence ।
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “चालू घडामोडी लक्षात घेता, भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत बांगलादेशमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या बांगलादेशमध्ये उपस्थित असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हालचाल मर्यादित ठेवण्याचा आणि आपत्कालीन फोन नंबरद्वारे ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला जातो.”
आपत्कालीन क्रमांक देखील जारी Bangladesh Violence ।
मंत्रालयाने आपत्कालीन क्रमांक देखील जारी केले आहेत, जे 8801958383679, 8801958383680, 8801937400591 आहेत. शेजारील देशात उपस्थित असलेल्या कोणत्याही नागरिकाला कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तो दिलेल्या क्रमांकांवर कॉल करून भारतीय उच्चायुक्तांशी संपर्क साधू शकतो. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय विद्यार्थीही आठवड्याभरापूर्वीच बांगलादेशातून देशात परतले आहेत.
हेही वाचा
दोन आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई; पालकमंत्र्यांसमोरच बच्चू कडू आणि रवी राणांमध्ये खडाजंगी





