बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा हिंसाचार ; WhatsApp-Instagram सह सोशल मीडिया ॲपवर बंदी

Bangladesh Social Media Apps Ban। बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात पुन्हा निदर्शने सुरू झाली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर याठिकाणी लोकप्रिय सोशल मीडिया ॲप्स इन्स्टाग्राम, फेसबुक, टिकटॉक आणि यूट्यूबवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
देशात निदर्शने सुरु असताना हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. या सोशल मीडिया ॲप्सवर लादण्यात आलेल्या बंदीबाबत बांगलादेश सरकारकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. त्याठिकाणच्या वृत्तपत्रामध्ये ही माहिती देण्यात आलीय.
या ॲप्सवर बंदी घालण्यात आली Bangladesh Social Media Apps Ban।
इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, बांगलादेशातील सरकारने Instagram, TikTok, YouTube आणि WhatsApp या लोकप्रिय सोशल मीडिया ॲप्सच्या वापरावर तात्पुरती बंदी घातली आहे. याआधी शुक्रवारी या बंदीची माहिती स्थानिक वृत्तवाहिनीने आपल्या अधिकृत खात्याद्वारे दिली होती.
ग्लोबल आयजच्या अहवालात असेही म्हटले आहे की,”शुक्रवारपासून देशभरातील सोशल मीडिया साइटवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. सरकारने मेटा प्लॅटफॉर्मचे नेटवर्क दुपारी 12 नंतर मर्यादित केले आहे आणि व्हीपीएन वापरूनही सोशल मीडियाचा वापर करता येणार नाही म्हणून इंटरनेटचा वेगही कमी केला आहे.
गेल्या महिन्यातही बंदी घालण्यात आली होती Bangladesh Social Media Apps Ban।
बांगलादेशात शुक्रवारी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या सरकारविरोधात पुन्हा निदर्शने सुरू झाली. यापूर्वी गेल्या महिन्यातही ही निदर्शने झाली होती, त्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती.
गेल्या महिन्यातही इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर बंदी घालण्यात आली होती आणि इंटरनेट आणि सोशल साइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर आरक्षण कोट्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रकरण थोडे शांत झाले, त्यानंतर पुन्हा आंदोलने सुरू झाली.





