ढाका :- बांगलादेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनल पार्टीच्या दोन प्रमुख नेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा द्यावा यामागणीसाठी “बीएनपी’ने राजधानी ढाकामध्ये आज विराट मोर्च्याचे आयोजन केले होते. त्यापूर्वीच या दोन नेत्यांना अटक करण्यात आली.
बांगलादेश नॅशनल पार्टीचे सरचिटणीस मिर्झा फकरुल इस्लाम आलमगिर आणि स्थायी समितीचे सदस्य मिर्झा अब्बास यांना गुप्तचर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काल पहाटेच्या सुमारास त्यांच्या घरांमधून ताब्यात घेतले. मिर्झा फकरुल इस्लाम आलमगिर यांना पहाटे 3 वाजता ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरोधात काही प्रकरणे प्रलंबित आहेत.
“बीएनपी’ पक्षाच्या नेत्या आणि माजी पंतप्रधान खालेदा झिया या सरकारच्याविरोधात मोहिम राबवत आहेत. या प्रकरणी पक्षाचे स्थायी समितीचे सदस्य मिर्झा अब्बास यांनाही अशाच प्रकारे पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
#UK : बळजबरीच्या धर्मांतर प्रकरणी पाकिस्तानातील मुस्लिम धर्मगुरुसह 30 जणांवर ब्रिटनने घातले निर्बंध
देशात नव्याने निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी “बीएनपी’ने आज मोठा मोर्चा काढण्याची तयारी केली होती. “बीएनपी’च्या कार्यकर्त्यांनी घडवलेल्या हिंसाचारात एक जण ठार झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते.