ढाका – बांगलादेशने पाकिस्तानी नागरीकांना आपल्या देशाचे व्हिसा देणे तात्पुरते थांबवले आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या निर्माण झालेल्या राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावर्षी बांगलादेशने पाकिस्तानी उच्चायुक्तांनाहीं आपल्या देशाचा व्हिसा नाकारला होता. तेव्हापासून दोन्हीं देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. ही व्हिसा बंदी आठवडाभरासाठीच आहे. तिच्या मुदतवाढीचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे.
पाकिस्तानकडून बांगला नागरीकांना व्हिसा जारी करण्यात अडचणी येत आहेत. त्यांच्या व्हिसा अर्जांवर निर्णय होत नाहीत त्यामुळे त्याला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेशाने ही कृती केली असल्याचे सांगण्यात येते. बांगलादेशाने पाकिस्तानी नागरीक आणि अधिकाऱ्यांना व्हिसा देणे 13 मे पासूनच थांबवले असल्याचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे.