Bangladesh Election 2026 : बांग्लादेशात नव्या पर्वाची सुरुवात; तारिक रहमान यांच्या विजयानंतर युनूस यांची एक्झिट
Bangladesh Election 2026 : बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते तारिक रहमान डिसेंबरमध्ये दोन दशकांनंतर लंडनहून परतले आणि पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार ठरले.
Bangladesh Election 2026 : बांगलादेशात झालेल्या बंडानंतर मोहम्मद युनूस यांनी सरकारची सूत्रे हाती घेतली. मात्र नुकतेच झालेल्या बांगलादेशातील १३ व्या संसदीय निवडणुकीत ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ने (BNP) मोठा आणि ऐतिहासिक विजय मिळवला. निवडणुकीत तारिक रहमान यांच्या मोठ्या विजयानंतर आता बांगलादेशचे मुख्य सल्लागार आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते डॉ. मोहम्मद युनूस यांना पद सोडावे लागणार आहे. यासोबतच देशाच्या नव्या उभारणीच्या प्रयत्नांना सुरुवात होणार आहे.
युनूस यांचा प्रवास
डॉ. युनूस जगभरात गरीबांसाठी कर्ज म्हणजेच मायक्रोक्रेडिटची संकल्पना मांडण्यासाठी ओळखले जातात. श्रीमंतांप्रमाणेच गरिबांनाही कर्ज दिलं जाणं फक्त गरजेचंच आहे, हे त्यांनी आपल्या ग्रामीण बँक चळवळीतून दाखवून दिलं
१९७४ च्या भीषण दुष्काळानंतर त्यांना जाणवले की केवळ शिक्षण पुरेसे नाही, तर गरीबांना पुढे जाण्यासाठी आर्थिक मदतीचीही गरज आहे. याच विचारातून ग्रामीण बँकेची स्थापना झाली. कार्यवाहक पंतप्रधान बनल्यानंतर त्यांच्या समोर सरकारी यंत्रणा सुदृढ करण्याचे मोठे आव्हान होते. देश पुन्हा हुकूमशाहीकडे जाऊ नये, हा त्यांचा स्पष्ट संदेश होता.
देशाला योग्य दिशेने घेऊन जाणेही महत्त्वाचे
युनूस सरकारने स्पष्ट केले की, केवळ निवडणुका घेणे पुरेसे नाही, तर निवडणुकांनंतर देशाला योग्य दिशेने नेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. १९ जानेवारी रोजी देशाला संबोधित करताना युनूस यांनी जनमतसंग्रहाच्या समर्थनाची अपील केली आणि सांगितले की जर लोकांनी “होय” मध्ये मतदान केले तर नव्या बांग्लादेशाचा मार्ग खुला होईल. Bangladesh Election 2026
राजकीय परिस्थिती आणि तणाव
अवामी लीगच्या पक्षप्रमुख शेख हसीना सध्या भारतात निर्वासित जीवन जगत असून त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने ऑगस्ट २०२४ मधील आंदोलनांदरम्यान घातक शक्ती वापरण्याचे आदेश दिल्या प्रकरणात त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. नागरिकांविरुद्धच्या गुन्ह्यांबाबत त्यांना जन्मठेपेची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. Bangladesh Election 2026
अवामी लीगचा विरोध
अवामी लीगने युनूस सरकारने जाहीर केलेली निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे फेटाळून लावली आहे. पक्षाने १२ फेब्रुवारी २०२६ ही निवडणुकीची तारीख बेकायदेशीर असल्याचे म्हटले आणि विद्यमान प्रशासनावर कठोर टीका केली. या सरकारच्या अंतर्गत निष्पक्ष निवडणुका होऊ शकत नाहीत, असा पक्षाचा दावा आहे. हसीना सरकार कोसळल्यानंतर भारतासोबतच्या संबंधांमध्येही तणाव निर्माण झाला आहे.
हिंसाचाराच्या घटनांमुळे चिंता वाढली
दुसरीकडे, बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते तारिक रहमान डिसेंबरमध्ये दोन दशकांनंतर लंडनहून परतले आणि पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार म्हणून समोर आले. त्यांचा मुख्य मुकाबला जमात-ए-इस्लामीशी होता, मात्र या लढतीत बीएनपीने स्पष्ट विजय मिळवला.
दरम्यान, देशात सांप्रदायिक तणाव आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे चिंता वाढली आहे. तसेच डिसेंबरमध्ये विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येमुळे वातावरण आणखी तापले. Bangladesh Election 2026
बीएनपीचा विजय बांगलादेशच्या राजकारणात मोठा बदल घडवणारा ठरत आहे. माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान हे दीर्घकाळ लंडनमध्ये वास्तव्यास होते, मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने आता जबरदस्त कामगिरी केली आहे. विविध अहवालांनुसार, तारिक रहमान हे बांगलादेशचे पुढचे पंतप्रधान होऊ शकतात आणि १४ फेब्रुवारी रोजी त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. Bangladesh Election 2026
बीएनपीला २११ हून अधिक जागा
निवडणूक निकालांमध्ये बीएनपीला २११ हून अधिक जागा मिळाल्या आहेत, तर जमात-ए-इस्लामी युतीला ७० आणि इतरांना १८ जागा मिळाल्या आहेत. बांगलादेशात गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेनंतर हे निकाल समोर आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, हा सत्तापालट भारत-बांगलादेश संबंधांमध्ये नवीन ऊर्जा आणू शकतो. पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे की, भारत एका लोकशाहीवादी, पुरोगामी आणि सर्वसमावेशक बांगलादेशाला आपले सहकार्य चालूच ठेवेल.
हेही वाचा:






