BCB : पाकविरूध्दच्या ऐतिहासिक मालिका विजयानंतर बांगलादेश संघ झाला मालामाल, अंतरिम सरकारनंकडून बक्षिसरूपी कोट्यावधींची रक्कम…

Bangladesh historic Test series win against Pakistan : बांगलादेश क्रिकेट संघानं नुकताच पाकिस्तानवर ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवला होता. या विजयामुळे खूश झालेल्या बांगलादेशच्या अंतरिम सरकारने खेळाडूंना बक्षिसरूपी रक्कम देण्याचे जाहीर केले आहे. शनिवारी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) च्या माध्यमातून ही माहिती दिली. क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार आसिफ महमूद यांनी बीसीबी अध्यक्ष फारुख अहमद यांना ही बक्षिसाची रक्कम सुपूर्द केल्याचे ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे.
बांगलादेशच्या खेळाडूंना किती मिळाली रक्कम …?
अलीकडेच बांगलादेश संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा 0-2 असा पराभव केला होता. बांगलादेशने रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करत नझमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला घरच्या मैदानावर पराभूत केले. आता पाकिस्तानच्या अंतरिम सरकारने संघाला बक्षीस दिले आहे. बोर्डाकडून सांगण्यात आले की सरकारने 3.20 कोटी बांगलादेशी टका (सुमारे 2.25 कोटी रुपये) बक्षीस दिले आहे. त्यातील काही भाग पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे.
Bangladesh cricket team has been awarded BDT 3.20 crore for their historic Test series win against Pakistan. BCB preseident Faruque Ahmed accepted the bonus from Asif Mahmud, Advisor to the Ministry of Youth and Sports. A portion will be donated to help flood victims. pic.twitter.com/Fp1T81qsUi
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 14, 2024
पाकविरूध्द पहिलाच मालिका विजय…
दरम्यान, बांगलादेश क्रिकेट संघाने 3 सप्टेंबर 2024 रोजी रावळपिंडीत नझमुल हुसैन शांतोच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला होता. बांगलादेशने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला होता तर याआधी पहिला सामना 10 गडी राखून जिंकून कसोटी सामन्यात पाकिस्तानला प्रथमच पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. अशाप्रकारे बांगलादेशने दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकत इतिहास रचला होता. विशेष म्हणजे बांगलादेशने प्रथमच पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका जिंकली होती.
IND vs BAN : बांगलादेशचा संघ भारतात दाखल, ‘या’ तारखेला चेन्नईत होणार पहिला कसोटी सामना…
दरम्यान, आता भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्याची कसोटी मालिका होणार आहे. 19 सप्टेंबरपासून ही मालिका सुरू होणार आहे. पहिली कसोटी चेन्नई येथे खेळविण्यात येणार आहे. पाकिस्तानविरुद्ध मालिका विजय मिळवल्यानंतर त्यांचे मनोबल उंचावले असून बांगलादेशचा संघ भारताविरूध्दच्या पहिल्या कसोटीसाठी रविवारी दुपारी चेन्नईला पोहोचला आहे. या मालिकेनंतर बांगलादेश संघ तीन सामान्यांची टी-20 मालिका देखील खेळणार आहे.





