बांगलादेशचा विराट कोहलीवर ‘फेक फिल्डिंग’चा आरोप; नेमकं प्रकरण काय आणि नियम काय सांगतो?

Virat Kohli – भारत आणि बांगलादेश यांच्यात टी-२० विश्वचषकाचा सामना ऍडिलेड येथील क्रिकेट मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियम लागू झाल्यानंतर बांगलादेशवर ५ धावांनी विजय मिळवला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १८४ धाव केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला पावसाचा व्यत्यय आल्याने त्यांना १६ षटकांत १५१ धावांचे सुधारित लक्ष मिळाले होते. मात्र बांगलादेश संघ १४५ धावांपर्यंत मजल मारू शकला.
#INDvsBAN | दिनेश कार्तिक OUT नव्हता? चाहत्यांचा सोशल मीडियावर राग अनावर
दरम्यान, या सामन्यानंतर बांगलादेशाकडून विराट कोहलीवर ( Virat Kohli ) फेक फिल्डिंगचे आरोप केले जात आहेत. फेक फिल्डिंग म्हणजे नेमकं काय? आणि आयसीसीचा नियम काय सांगतो? याबाबत जाणून घेणार आहोत. सामन्यानंतर बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज नुरुल हसनने विराट कोहलीवर ( Virat Kohli ) फेक फिल्डिंगचा आरोप केला. तो म्हणाला की, “कोहलीने सामन्यात फेक फिल्डिंग केले होते, ज्याकडे पंचांनी लक्ष दिले नाही. पंचांनी तो प्रकार पाहिला असता तर बांगलादेश संघाला पेनल्टी म्हणून ५ धावा मिळाल्या आल्या. त्यामुळे सामन्याचा निकाल कदाचित वेगळा लागला असता आणि बांगलादेश संघ सामनाही जिंकू शकला असता.”
कोहलीच्या ( Virat Kohli ) फेक फिल्डिंगची घटनाही कॅमेऱ्यात कैद झाली असल्याचे समोर आले आहे. त्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सामन्यात बांगलादेशच्या डावावेळी ७व्या षटकात ही घटना घडली होती. फिरकीपटू अक्षर पटेलने टाकलेल्या चेंडूवर ऑफ साईडला शॉट खेळून फलंदाज लिटन दास धाव घेण्यासाठी धावला. त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना अर्शदीप सिंगने चेंडू यष्टीरक्षक दिनेश कार्तिककडे फेकला.
यावेळी पॉईंटवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या विराटने ( Virat Kohli ) त्याच्या हातात चेंडू नसतानाही नॉन स्ट्राईकर एंडकडे थ्रो करण्याची कृती केली. अशा कृत्याला नियमानुसार चुकीचे मानले जाते, मात्र त्यावेळी पंच मराइस इरास्मस आणि ख्रिस ब्राउन यांचे विराटच्या या कृतीकडे लक्ष न गेल्याने त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.
Nurul Hasan has claimed that the on-field umpires had missed an incident of “fake fielding” from Virat Kohli, which could have resulted in five potentially crucial penalty runs for Bangladesh pic.twitter.com/I6fmIDUUA2
— Alx_uchiha (@Alx_uchiha_12) November 3, 2022
‘फेक फिल्डिंग’ प्रकरणाबाबत नियम काय सांगतो
नियम ४१.५ मध्ये क्रिकेटमधील अयोग्य खेळाचे वर्णन केले आहे. यानुसार, फलंदाजाचे जाणूनबुजून लक्ष विचलित करणे, कोणत्याही प्रकारे फसवणे किंवा कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करणे याला मनाई आहे. असे झाल्यास पंच या नियमानुसार हा चेंडू डेड बॉल म्हणून घोषित करू शकतात. तसेच फलंदाजी करणाऱ्या संघाला पेनल्टी स्वरूपाने ५ धावा दिल्या जाऊ शकतात.
Saw that video of Virat’s fake fielding.
You can clearly see the batter completely deceived and bamboozled by Kohli’s heinous actions as he comfortably completes the run, without even noticing Kohli.
— Sorabh Pant (@hankypanty) November 3, 2022





