ढाका :- देशाची राजधानी दिल्लीनतंर बांग्लादेशही निघृण हत्येच्या घटनेने हादरला आहे. येथील खुलना शहरातील गोबरचका परिसरात अबू बकर नावाच्या व्यक्तीने स्वत: रिलेशनशिपमध्ये राहुनही एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. यानंतर दोघांमध्ये झालेल्या वादानंतर तिची निर्घृण हत्या करून तिचे अनेक तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हत्येच्या काही दिवसांपूर्वी कविता आणि अबू बकर यांची भेट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनेच्या पाच दिवस आधी आरोपी महिलेला भेटला होता. मात्र, या काळात तिला अबूच्या आधी पासूनच रिलेशनमध्ये असल्याची बाब माहिती झाली आणि यावरुन दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. यातुन झालेल्या वादातून त्याने तिची हत्या केली.
ही हत्येची घटना रविवारी, 6 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली, जेव्हा आरोपी अबू बकर कामावर आला नाही आणि त्याचा फोन बंद होता. तो ज्या ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करतो त्या कंपनीच्या मालकाने कोणालातरी त्याच्या भाड्याच्या घरात या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाठवले असता, त्या व्यक्तीने घराला कुलूप लावलेले दिसले आणि घरमालकाला माहिती दिली. मात्र, परिस्थिती संशयास्पद झाल्यावर घरमालक राजू यांनी पोलिसांना माहिती दिली.
China Coronavirus Updates : चीनच्या ‘या’ शहरामध्ये ‘अडीच लाख’ विलगीकरण खाटांची तयारी
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडला तेव्हा घराच्या एका पेटीत हिंदू महिलेचा शिर नसलेला मृतदेह आढळून आला. घराची अधिक झडती घेतली असता डोके पॉलिथिनमध्ये गुंडाळलेले आढळले, मात्र हात गायब होते. एवढेच नाही तर जवळच्या नाल्याची तपासणी केली असता त्यात अनेक मांसाचे तुकडे आणि हाडे पडलेले आढळून आले.