बीजिंग – चीनच्या गुआंझूा शहरामध्ये करोनाचे रुग्ण नव्याने वाढायला लागल्यामुळे शहराच्या प्रशासनाने तबल अडीच लाख रुग्णांच्या विलगीकरणाची तयारी केली आहे. सध्या चीनमध्ये ज्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण नव्याने दिसायला लागले आहेत, त्यात गुआंझूा शहर प्रमुख आहे.
या शहरात गेल्या 24 तासात 9 हजार रुग्ण सापडले आहेत. गुआंझूा शहरात आतापर्यंत 95 हजार रुग्णांना विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे. चीनमध्ये सध्या 24 हजार सक्रिय रुग्ण आहेत. करोनाच्या चीनमधील रुग्णांची संख्या अमेरिका किंवा अन्य देशांच्या तुलनेत कमी वाटत असली, तरी तेथील आकडेवारी छुपी असल्याचे मत निरीक्षकांनी नोंदवले आहे.
“झिरो कोविड’ धोरणाच्या अंमलबजावणीच्या अट्टहासापायी चीनमध्ये कडक निर्बंध लावले जाऊ लागले आहेत. त्याच्या विरोधात नागरिकांनी तीव्र निदर्शने करायला सुरुवात केली आहे.
दरम्यान, चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे संभाव्य लॉकडाऊनच्या भीतीने लोकांनी निर्बंधांना विरोध करायला सुरुवात केली आहे.