सातारा | भिवंडीतील खुनाच्या घटनेच्या निषेधार्थ फलटणमध्ये बंद
Updated On:

फलटण, (प्रतिनिधी) – भिवंडी (जि. ठाणे) येथील दलित समाजातील संकेत भोसले या 16 वर्षांच्या मुलाच्या खुनाच्या निषेधार्थ सोमवारी पुकारण्यात आलेल्या फलटण बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भीमसैनिकांनी मोर्चा काढून प्रांताधिकार्यांना निवेदन दिले.
भिवंडी येथील संकेत भोसले याचे क्षुल्लक वादातून दि. 14 रोजी अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी फलटण बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने बंद होती. भीमसैनिकांनी सकाळी 11 वाजता मोर्चा काढून प्रांताधिकार्यांना निवेदन दिले.





