Banana Benefits: केळी हे सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारं आणि शरीरासाठी अत्यंत पौष्टिक फळ मानलं जातं. कमी किमतीत भरपूर पोषण देणाऱ्या फळांमध्ये केळीचा समावेश होतो. अनेक लोक सकाळच्या नाश्त्यात, व्यायामानंतर किंवा भूक लागल्यावर केळी खातात. कारण केळीत शरीरासाठी आवश्यक असलेले अनेक पोषक घटक असतात. तज्ज्ञांच्या मते, रोज एक ते दोन केळी खाल्ल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसू शकतात. केळीत फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. एका पिकलेल्या केळीत साधारण ९० ते १०५ कॅलरी असतात. त्यामध्ये नैसर्गिक साखर, कार्बोहायड्रेट्स आणि कमी प्रमाणात फॅट असते. त्यामुळे केळी शरीराला पटकन ऊर्जा देण्याचे काम करतात. शरीराला मिळते झटपट ऊर्जा केळीत ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोजसारखी नैसर्गिक साखर असते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी किंवा व्यायामाच्या आधी केळी खाल्ल्यास शरीराला झटपट ऊर्जा मिळते. व्यायामानंतर केळी खाल्ल्यास थकवा कमी होण्यास मदत होते. म्हणूनच अनेक खेळाडू आणि जिम करणारे लोक आपल्या आहारात केळीचा समावेश करतात. हृदयासाठी फायदेशीर केळीत पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. हे शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तसेच हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी पोटॅशियम महत्त्वाची भूमिका बजावते. केळीत सोडियम कमी असल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत मिळू शकते. Bananas: Facts, benefits and nutrition रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते केळीत असलेले व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. नियमित केळी खाल्ल्यास सर्दी, खोकला आणि इतर संसर्गजन्य आजारांपासून बचाव होण्यास मदत होऊ शकते. तसेच शरीराला ताकद आणि ताजेपणा मिळतो. त्वचेसाठीही उपयुक्त केळीत असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेची चमक वाढवण्यास मदत करतात. नियमित केळी खाल्ल्यास त्वचा मऊ आणि तजेलदार राहण्यास मदत होते. त्वचेवरील कोरडेपणा आणि सुरकुत्या कमी करण्यासाठीही केळी उपयुक्त मानली जातात. वजन कमी करण्यास मदत केळीत फायबर जास्त असल्यामुळे पोट लवकर भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी केळी फायदेशीर ठरू शकतात. दही किंवा शेंगदाण्यासोबत केळी खाल्ल्यास अधिक फायदा होतो. पचनक्रिया सुधारते केळी पचनासाठीही खूप चांगली मानली जातात. त्यातील फायबरमुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत होते. नियमित केळी खाल्ल्यास पोट साफ राहते आणि पचनक्रिया मजबूत होते. तज्ज्ञांच्या मते, केळी नेहमी ताजी आणि मर्यादित प्रमाणात खावीत. रात्री उशिरा केळी खाणे टाळावे. मधुमेह असलेल्या लोकांनी लहान आकाराची किंवा अर्धी केळी खाणे योग्य ठरते.