\n

तिसऱ्या टी-20 मध्ये प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकात 7 विकेट गमावत 189 धावा केल्या होत्या. यामध्ये चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या झाकीर अलीने बांगलादेशकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने 41 चेंडूत 6 षटकारांसह नाबाद 72 धावा केल्या. बांगलादेशकडून झाकीर अली हा एकमेव खेळाडू होता ज्याने सामन्यात अर्धशतक झळकावले. याव्यतिरिक्त परवेझ हुसेन इमॉनने 21 चेंडूत 39 धावांचे तर मेहंदी हसन मिराजने 23 चेंडूत 29 धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून गोलंदाजीत रोमॅरियो शेफर्डने सर्वाधिक 2 बळी घेतले. याशिवाय अल्झारी जोसेफ, रोस्टन चेस आणि गुडाकेश मोती यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.

\n

प्रत्युत्तरात यजमान वेस्ट इंडिजचा संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा सुरुवातीपासूनच त्यांची अवस्था वाईट होती. 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना निम्मा संघ अवघ्या 46 धावांत गारद झाला यावरून वेस्ट इंडिजच्या खराब स्थितीचा अंदाज येतो. संघाच्या खराब स्थितीत पुढे आणखी काही सुधारणा झाली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की संपूर्ण संघ 16.4 षटकांत 109 धावसंख्येवर गारद झाला. म्हणजे यजमान वेस्ट इंडिजला पूर्ण २० षटकेही खेळता आली नाहीत.

\n

सलामीवीर ब्रँडन किंग खाते न उघडताच माघारी परतला. तर जॉन्सन चार्ल्सने 18 चेंडूत 23 धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजसाठी रोमारिया शेफर्डने 27 चेंडूत सर्वाधिक 33 धावा केल्या. या खेळीत त्याने 1 चौकार आणि 3 षटकार मारले. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पुरनने 10 चेंडूत 15 धावा केल्या. रोस्टन चेस, रोव्हमन पॉवेल आणि जस्टिन ग्रेव्हजसारख्या फलंदाजांनी निराशा केली.

\n

बांगलादेशकडून गोलंदाजीत रिशद होसेन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकात 21 धावा देत वेस्ट इंडिजच्या 3 फलंदाजांना आपले बळी बनवले. याशिवाय तस्किन अहमद आणि मेहंदी हसन मिराजने प्रत्येकी 2-2 बळी घेतले. तर तंजीम हसन साकिब आणि हसन महमूद यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.

\n

वेस्ट इंडिज सलग तिसऱ्यांदा धावांचा पाठलाग करताना अपयशी…

\n

लक्ष्याचा पाठलाग करण्यात वेस्ट इंडिजचा संघ अपयशी ठरण्याची टी-20 मालिकेतील ही सलग तिसरी वेळ आहे. पहिल्या टी-20 सामन्यात त्यांना 148 धावांचा पाठलाग करता आला नाही. तसेच दुसऱ्या T20 मध्ये बांगलादेशच्या गोलंदाजांनी त्यांना 130 धावांचा पाठलाग करण्यापासून रोखले होते.

\n

Border-Gavaskar Trophy 2024/25 : अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघात मोठे बदल, ‘या’ 2 नवख्या खेळाडूंना दिली संधी….

\n

\n

हे खेळाडू ठरले बांगलादेशच्या विजयाचे हिरो

\n

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20I मध्ये बांगलादेशच्या विजयाचा नायक झाकीर अली(41 चेंडूत 72 धावा) होता, ज्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या मालिकेत 37 धावा आणि 8 विकेट्स घेणाऱ्या मेहदी हसनला टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडूचा किताब देण्यात आला.

\n

 

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"BAN vs WI 3rd T20 : बांगलादेशकडून वेस्ट इंडिजचा सुपडा साफ, टी-20 मालिकेवर 3-0 ने केला कब्जा….","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/12/ban-4.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Swapnilhajare","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ban-vs-wi-bangladesh-whitewashes-west-indies-wins-series-3-0#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/12/ban-4.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/ban-vs-wi-bangladesh-whitewashes-west-indies-wins-series-3-0#webpage","name":"BAN vs WI 3rd T20 : बांगलादेशकडून वेस्ट इंडिजचा सुपडा साफ, टी-20 मालिकेवर 3-0 ने केला कब्जा….","url":"https://www.dainikprabhat.com/ban-vs-wi-bangladesh-whitewashes-west-indies-wins-series-3-0","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ban-vs-wi-bangladesh-whitewashes-west-indies-wins-series-3-0#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/12/ban-4.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/ban-vs-wi-bangladesh-whitewashes-west-indies-wins-series-3-0#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/ban-vs-wi-bangladesh-whitewashes-west-indies-wins-series-3-0","name":"BAN vs WI 3rd T20 : बांगलादेशकडून वेस्ट इंडिजचा सुपडा साफ, टी-20 मालिकेवर 3-0 ने केला कब्जा…."}}]}}}

BAN vs WI 3rd T20 : बांगलादेशकडून वेस्ट इंडिजचा सुपडा साफ, टी-20 मालिकेवर 3-0 ने केला कब्जा….