WI vs BAN : सलग दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिज पराभूत, बांगलादेशची मालिकेत अजेय आघाडी…

WI vs BAN 2nd T20 Match Result : शमीम हुसेन (नाबाद 35), मेहदी हसन मिराझ (26) धावांच्या खेळीनंतर गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 27 धावांनी पराभव केला. या विजयासह बांगलादेशने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. तिसरा व अंतिम सामना शुक्रवारी खेळविण्यात येणार आहे.
West Indies vs Bangladesh | 2nd T20I
Bangladesh won the match by 27 Runs 🇧🇩 👏PC: CWI#BCB | #Cricket | #BANvWI | #T20 pic.twitter.com/Pfj1bWbNHy
— Bangladesh Cricket (@BCBtigers) December 18, 2024
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने निर्धारित 20 षटकांमध्ये 7 बाद 129 धावांपर्यंत मजल मारली. यामध्ये शमीम हुसैनने सर्वाधिक 35 धावांची खेळी करताना बांगलादेश संघाला 100 धावांचा टप्पा गाठून दिला. त्याला मेहदी हसन मिराजने 26 तर जाकेर अलीने 21 धावा करताना सुरेख साथ दिली. वेस्ट इंडिज संघाकडून गुडाकेश मोतीने 2 तर अकेल होसीन, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ व ओबेद मॅकॉय यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
विजयासाठी आवश्यक असणाऱ्या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाचा डाव 18.3 षटकांत 102 धावांवर संपुष्टात आला. रोस्टन चेस व अकेल होसीन यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकला नाही. रोस्टन चेसने 32 तर अकेल होसीनने 31 धावांची खेळी करताना चांगली झुंज दिली.
SA vs PAK 1st ODI : सलमान आगाची अष्टपैलू कामगिरी, पाकचा आफ्रिकेवर 3 गडी राखून विजय….
तस्किन अहमदने 3 गडी बाद करताना संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. त्याला रशीद होसेन, तंझिम हसन साकिब व मेहदी हसन यांनी प्रत्येकी 2 तर हसन मेहमुदने 1 गडी बाद करताना सुरेख साथ दिली. शमीम हुसैनला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


