BAN vs IND – भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला आजपासून चित्तगाव येथील क्रिकेट मैदानावर सुरुवात झाली आहे. सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना आजच्या दिवसाअखेर ६ गडी गमावून २७८ धावा केल्या आहेत. यादरम्यान, श्रेयस अय्यर फलंदाजी करत असताना बांगलादेशच्या इबादत हुसेनच्या गोलंदाजीवर एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली. सामन्याच्या ८४व्या षटकात जेव्हा इबादत हुसैन अय्यरला गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेला एक चेंडू थेट स्टंपवर आदळला आणि लाईट लागली, मात्र बेल्स पडल्याचं नाही. त्यामुळे अय्यर बाद झाला नाही.
ऐकलं का? अवघ्या १५ वर्ष वयाच्या खेळाडूवर लागणार IPL लिलावात बोली
या घटनेनंतर श्रेयस अय्यरलाही हसू आवरले नाही. त्यालाच कळेनासे झाले की, त्या बेल्स का पडल्या नाही. यावर बांगलादेशच्या गोलंदाजासह इतर खेळाडूंनाही आश्चर्याचा धक्काच बसला. या घटनेकडे पाहून असे वाटते की, आज नियती श्रेयस अय्यरवर चांगलीच मेहरबान होती. त्याचा याअगोदर एक झेलही बांगलादेशच्या खेळाडूंकडून सुटला होता.
An incredible moment on Day 1. pic.twitter.com/WpxZYsL3SD
— Johns. (@CricCrazyJohns) December 14, 2022
चेतेश्वर पुजारा ९० दहावंवर खेळात असताना शतकाच्या अत्यंत जवळ जाऊन बाद झाला. बांगलादेशचा फिरकीपटू तैजुल इस्लामने पुजाराला बाद करून भारतीय संघाला मोठा धक्का दिला. पुजारा आणि अय्यर यांच्या भागीदारीमुळे भारतीय संघाला चांगली मजबुती मिळाली होती. मात्र पुजारा बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या अक्षर पटेलने दिसाच्या खेळाच्या शेवटच्या चेंडूवर १४ धावांवरच आपली विकेट गमावली. श्रेयस अय्यर ८२ धावांवर नाबाद आहे.