IPL 2023 Auction – भारताची आयपीएल क्रिकेट स्पर्धा म्हटलं की जगभरातील क्रिकेट चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा असतो. याच स्पर्धेने देशातील अनेक खेळाडूंसह इतर विदेशी खेळाडूंनाही ओळख निर्माण करून दिली आहे. त्याचबरोबर ज्या खेळाडूंकडे प्रतिभा आहे अशा खेळाडूंवर तर अक्षरश पैशांचा पाऊसच पडतो. पुढील वर्षीच्या आयपीएल हंगामासाठीचा ( IPL 2023 ) मिनी लिलाव हा २३ डिसेंबरला होणार आहे. महत्वाचं म्हणजे या लिलावात अवघ्या १५ वर्ष वय असलेल्या खेळाडूचाही समावेश आहे. मात्र, या खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी कोणती फ्रँचायझी बोली लावणार हे पाहावे लागेल.
ICC Ranking | ICC वनडे क्रमवारीत ईशान किशनची गरुडझेप तर विराट कोहलीला…
अफगाणिस्तानच्या १५ वर्ष वय असलेल्या या खेळाडूचे नाव अल्लाह मोहम्मद गझनफर असे आहे. तो उजव्या हाताने ऑफ-स्पिन गोलंदाजी करतो. २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणाऱ्या आयपीएल लिलावात तो सर्वात युवा खेळाडू असणार आहे. अल्लाह मोहम्मद गझनफर याने या वर्षाच्या सुरुवातीला बिग बॅश लीग लिलावासाठी स्वतःचे नामांकन केले होते परंतु त्याला कोणीही खरेदीदार मिळाला नाही. तो त्यांच्याच देशाच्या फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमानप्रमाणे मिस्ट्री फिरकी गोलंदाजी करतो.
ICC Ranking | ICC वनडे क्रमवारीत ईशान किशनची गरुडझेप तर विराट कोहलीला…
आर अश्विनला मानतो प्रेरणास्थान
काबूलमध्ये स्पोर्ट्स स्टारशी बोलताना अल्लाह मोहम्मद गझनफर रविचंद्रन अश्विनबद्दल म्हणाला की, “आर अश्विन भारतासाठी चॅम्पियन फिरकीपटू आहे आणि मला त्यांच्या गोलंदाजीमधील विविधता आवडते. मी त्यांना नेहमीच माझे प्रेरणास्थान मानले आहे. मी टेनिस बॉल क्रिकेटपासून सुरुवात केली आणि माझ्या परिसरात क्रिकेट खेळायचो, यानंतर माझ्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली मी फिरकी गोलंदाजी सुरू केली. वारंवार सरावामुळे लवकरच मी फिरकी गोलंदाजाप्रमाणे अॅक्शन शिकलो. त्यानंतर मी माझ्या करिअरमध्ये मागे वळून पाहिले नाही.” आयपीएल २०२३साठीच्या लिलावात त्याने त्याची मूळ किंमत २० लाख रुपये ठेवली आहे.