शिख्स फॉर जस्टीस या खलिस्तानवादी संघटनेवरील बंदीची मुदत 5 वर्षांनी वाढवली
Updated On:

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने शिख्स फॉर जस्टिस (एसएफजे) या खलिस्तानवादी संघटनेवरील बंदीची मुदत ५ वर्षांनी वाढवली. भारताविरोधी कारवायांत गुंतल्याबद्दल ते पाऊल उचलण्यात आले. अमेरिकास्थित वादग्रस्त वकील गुरपतवंतसिंग पन्नून याने त्या संघटनेची स्थापना केली आहे.एसएफजेवर ५ वर्षांपूर्वी बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) बंदी घालण्यात आली.
आता त्या बंदीवरील मुदतवाढ १० जुलैपासून लागू होईल. एसएफजे ही संघटना पंजाब आणि इतरत्र देशविरोधी कारवाया करण्यात गुंतली आहे. देशाचे अखंडत्व आणि सार्वभौमत्वाला बाधा पोहचवण्याचे त्या संघटनेचे मनसुबे आहेत, असे गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले. केंद्र सरकारने याआधीच पन्नूनलाही दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.





