नेपाळमध्ये चिनी डिजीटल वॉलेटवर वॉलेटवर बंदी

काठमांडू – नेपाळमध्ये आजपासून “अलीपे’ आणि “वुईचॅट’सारख्या चिनी डिजीटल वॉलेटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. हजारो चिनी पर्यटकांच्या माध्यमातून या डिजीटल वॉलेटचा वापर नेपाळमधील वास्तव्यादरम्यान करत असतात. नेपाळमधील पर्यटन ठिकाणी असलेल्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि दुकानांमध्ये विशेषतः चिनी उद्योजकांच्या दुकानांमध्ये या डिजीटल वॉलेटचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता. त्यामुळे नेपाळला विदेशी चलनातील उत्पन्न मिळत नव्हते. हा तोटा टाळण्यासाठी नेपाळ सरकारने या डिजीटल वॉलेटच्या वापरावर बंदी घातली आहे.

“अलीपे’ची सुरुवात ई कॉमर्समधील अग्रगण्य अलिबाबाने केली आहे. त्याची मालकी ऍन्ट फायनान्शियलकडे आहे. “वुईचॅट’ या मेसेजिंग ऍपचा वापर प्रामुख्याने चिनी लोकांकडून केला जातो. याच ऍपच्या माध्यमातून चिनी लोक पेमेंटही करतात. आता या डिजीटल वॉलेटच्या वापरावर बंदी आल्यामुळे नेपाळमधील व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here