‘इतरांकडे बोट दाखवण्यापूर्वी…’; रेल्वे अपहरणाच्या पाकिस्तानच्या आरोपांना भारताचे सडेतोड उत्तर

Balochistan Train Hijack । बलुचिस्तानमधील रेल्वे अपहरण घटनेची जबाबदारी टाळण्यासाठी पाकिस्तानने भारताला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारत सरकारने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच [पाकिस्तानच्या सर्व आरोपांना पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. ट्रेन अपहरणातील अपयश लपवण्यासाठी पाकिस्तानने यापूर्वी अफगाणिस्तानवर आरोप केले होते.
परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक निवेदन जारी पाकिस्नाला सडेतोड उत्तर दिले आहे. ‘भारत पाकिस्तानचे निराधार आरोप पूर्णपणे फेटाळतो. जागतिक दहशतवादाचे केंद्र कुठे आहे हे संपूर्ण जगाला माहित आहे. पाकिस्तानने इतरांकडे बोट दाखवण्याऐवजी आणि त्यांच्या अंतर्गत अपयशासाठी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे.” असे म्हटले आहे. भारताने स्पष्ट केले आहे की,”दहशतवादासंबंधीचे सत्य संपूर्ण जगासमोर आहे आणि पाकिस्तानने स्वतःच्या देशातील परिस्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.”
पाकिस्तानने भारतावर केले होते निराधार आरोप Balochistan Train Hijack ।
११ मार्च रोजी बंडखोर गट बलोच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले होते. ट्रेनमध्ये ४०० हून अधिक प्रवासी होते, त्यापैकी बहुतेक सैन्याचे सैनिक किंवा आयएसआयशी संबंधित पोलिस आणि सुरक्षा कर्मचारी होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बचाव मोहिमेत सुमारे १५५ प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे आणि २७ बलुच बंडखोर मारले गेले आहेत. हे अपयश लपवण्यासाठी अलिकडेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी भारतावर निराधार आरोप केले होते. बंडखोरांकडून ट्रेनचे अपहरण रोखण्यात आलेले अपयश लपविण्यासाठी, त्यांनी कोणत्याही पुराव्याशिवाय असे म्हटले होते की बलुच बंडखोरांना भारताकडून पाठिंबा मिळत आहे.
राणा सनाउल्लाह यांनी केला होता आरोप Balochistan Train Hijack ।
११ मार्च रोजी बंडखोर गट बलोच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले होते. या ट्रेनच्या अपहरणात भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी हे आरोप केले होते. त्यांच्या याच आरोपांना आता भारताने उत्तर दिले आहे.
हेही वाचा
अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाला आग ; विमानात ६ क्रू मेंबर्ससह १७८ प्रवाशांचा जीव टांगणीला ?





