Balen Shah Nepal Prime Minister: रामनवमीच्या दिवशी बालेन शाह यांचा नेपाळमध्ये राज्याभिषेक ; पंतप्रधानपदाची घेतली शपथ
Balen Shah Nepal Prime Minister: नेपाळमध्ये एका नव्या आणि अत्यंत रंजक पर्वाला सुरुवात झाली आहे. नेपाळच्या राजकारणात तरुणांनी प्रवेश केला आहे.

Balen Shah Nepal Prime Minister: नेपाळमध्ये एका नव्या आणि अत्यंत रंजक पर्वाला सुरुवात झाली आहे. नेपाळच्या राजकारणात तरुणांनी प्रवेश केला आहे. ३५ वर्षीय बालेन शाह यांची नेपाळचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी शपथ घेतली. ते नेपाळच्या इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान आणि देशाचे नेतृत्व करणारे मधेस प्रदेशातील पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी घटनात्मक तरतुदींनुसार बालेन यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. राष्ट्रपती भवन, शीतल निवास याठिकाणी आयोजित केलेला हा शपथविधी सोहळा हिंदू आणि बौद्ध परंपरांचा संगम साधणारा एक विशेष सोहळा होता. सात ब्राह्मणांनी शंखनाद केला, १०८ तरुण ब्राह्मणांनी वैदिक मंत्रांचे पठण केले आणि १०७ लामांनी बौद्ध धर्मग्रंथांचे पठण केले.
बालेन शाह काही वर्षांपूर्वीपर्यंत ते एक रॅपर म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर, ते काठमांडूचे महापौर झाले आणि आपल्या कामातून त्यांनी इतकी लोकप्रियता मिळवली की त्यांच्याच पक्षाने, राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने (आरएसपी), त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नामांकित केले.
चीनने काय म्हटले? Balen Shah Nepal Prime Minister:
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने नेपाळच्या नवीन पंतप्रधानांचे अभिनंदन केले आहे. चीनने म्हटले आहे की, नेपाळचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता जपण्यासाठी ते पूर्ण पाठिंबा देईल आणि नवीन सरकारसोबत व्यावहारिक सहकार्य अधिक दृढ करेल.
नेपाळ निवडणुकीचे निकाल Balen Shah Nepal Prime Minister:
नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आरएसपीने (RSP) प्रचंड विजय मिळवला. २७५ जागांच्या संसदेत पक्षाने १८२ जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळवले. नेपाळमधील मोठ्या युवा आंदोलनानंतर ही निवडणूक झाली, ज्यात लोकांनी जुन्या आणि भ्रष्ट राजकीय व्यवस्थेत बदलाची मागणी केली.
बालेन यांनी स्वतः चार वेळा पंतप्रधान राहिलेले केपी शर्मा ओली यांचा त्यांच्या बालेकिल्ला असलेल्या झापा-५ मध्ये मोठ्या फरकाने पराभव केला. हा विजय या गोष्टीचा पुरावा होता की नेपाळची जनता जुन्या नेत्यांना कंटाळली आहे. बालेन आता १५ ते १८ मंत्र्यांचे छोटे मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. नेपाळच्या नवीन पिढीला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.






