Balen Shah: नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारतासोबत संबंध अधिक मजबूत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्या शुभेच्छांसाठी बालेन शाह यांनी आभार मानत, भारतासोबत मिळून काम करण्याबाबत उत्सुकता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा देताना म्हटलं होतं की, बालेन शाह यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि नेपाळ यांच्यातील मैत्री आणि सहकार्य आणखी बळकट होईल. तसेच, नेपाळच्या जनतेचा त्यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वासही त्यांनी अधोरेखित केला. दोन्ही देशांनी एकत्र येऊन विकासाची नवी उंची गाठावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. Balen Shah यावर प्रतिक्रिया देताना बालेन शाह यांनी धन्यवाद देत सांगितलं की, “आपल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. भारतासोबत संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आणि दोन्ही देशांच्या लोकांच्या कल्याणासाठी एकत्र काम करण्यास मी उत्सुक आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे भारत-नेपाळ संबंधांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. Balen Shah दरम्यान, बालेन शाह यांनी शुक्रवारी नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या हस्ते पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या समारंभाला उपराष्ट्रपती, मुख्य न्यायाधीश, राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष, माजी पंतप्रधान आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. Balen Shah Balen Shah पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बालेन शाह यांनी तात्काळ कारवाईचा पवित्रा घेतला आहे. त्यांच्या आदेशानुसार माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना अटक करण्यात आली आहे. ‘जेन-जी आंदोलन’ दरम्यान झालेल्या हिंसाचारात निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात चौकशी आयोगाने संबंधित नेत्यांवर कारवाईची शिफारस केली होती. त्यानुसार आता कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकरणातील दोषींना जास्तीत जास्त १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे पुढील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याशिवाय, त्या काळातील काही पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बालेन शाह सरकार या प्रकरणात कठोर भूमिका घेत असून, पुढील काळात आणखी मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. एकूणच, बालेन शाह यांनी एका बाजूला भारतासोबत सहकार्याचा हात पुढे केला आहे, तर दुसऱ्या बाजूला देशातील कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. त्यामुळे नेपाळच्या राजकारणात नवा बदल घडण्याची चिन्हं दिसत आहेत.