सातारा | राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बाळासाहेब पिसाळ

वाई – सातारा जिल्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उपाध्यक्षपदी बाळसाहेब उर्फ राजेश पिसाळ यांची निवड करण्यात आली. खासदार नितीन पाटील यांच्या उपस्थितीत आ. मकरंद पाटील यांनी पिसाळ यांना निवडीचे पत्र प्रदान केले.
यावेळी आ. मकरंद पाटील म्हणाले, बाळासाहेब पिसाळ यांच्याकडे तरूणाईची ताकद आहे. सढळ हाताने त्यांनी लोकांना मदत केली आहे. नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पिसाळ म्हणाले, सर्वांना बरोबर घेऊन आपण काम करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करू. या पदाला न्याय देण्यासाठी जीवाच रान करू.
या निवडीबद्दल पिसाळ यांचे खा. नितीन पाटील, आ. मकरंद पाटील, कारखाना उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, संचालक दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजपुरे, दिलीपराव पिसाळ, लक्ष्मणराव पिसाळ, शहाजी पिसाळ, सरपंच सौ. मनीषा फरांदे, माजी सरपंच सौ. स्वाती कुदळे, संतोष पिसाळ, पंकज दुधे पाटील, अरविंद कुदळे, राजेंद्र कुदळे, सुरेश कुदळे, बापूसो कुदळे, विक्रम वाघ, प्रणित पिसाळ, महेश खांडे, अशोक पिसाळ, सतीश पिसाळ, गणेश पिसाळ, राजू कदम, अमित गोळे, मिलिंद शेडगे, संजय पिसाळ, बाळासाहेब कुदळे, शंकरराव फरांदे, सतीश दुधे पाटील, किसन नेवसे, दीपक कोरडे, संजय कुदळे, सतीश पिसाळ, सुभाष पिसाळ, मोहसीन मोमीन, बंटी मोमीन, उत्तम दादा भोसले, रामदास पिसाळ, ज्ञानेश्वर मालुसरे, दत्ता कुदळे, संपत मालुसरे, गिरीश पवार, प्रतीक पिसाळ, संदीप पिसाळ,विजय पिसाळ, महेश चव्हाण, माऊली चव्हाण, प्रतीक चव्हाण, विशाल मोहिते, सोमनाथ पिसाळ यांच्यासह ग्रामस्थानी अभिनंदन केले.





