Satara | शशिकांत कोचळे यांना बाल विकास समाजरत्न पुरस्कार प्रदान

वाई, (प्रतिनिधी) – येथील विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी या संस्थेचे संस्थापक शशिकांत कोचळे यांना बाल विकास समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार सोहळा २०२४ हा कार्यक्रम मुंबई येथील बांद्रा येथील नॅशनल लायब्ररी येथे २५ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांच्या हस्ते विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी या संस्थेचे संस्थापक शशिकांत कोचळे यांना “बाल विकास समाज रत्न पुरस्कार २०२४” देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्यामध्ये नासा शास्त्रज्ञ डॉ. डेरिक एंजल्स, संपादक डॉ. सुकृत खांडेकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाळासाहेब तोरस्कर, महाराष्ट्र राज्य पर्यटन समितीचे उपाध्यक्ष डॉ. माळवे, व्हिजन संस्था मुंबईचे संस्थापक अध्यक्ष प्रा . नागेश हुलवळे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
शशिकांत कोचळे सर हे विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी या संस्थेच्या माध्यमातून गेली ५ वर्ष सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत तसेच ह्या वर्षी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्वतः च्या जागेत एक मुलांचे वसतिगृह चालू केले आहे.
त्या वसतिगृहातील मुलांना शिक्षणासाठी हे कार्य करीत आहेत म्हणून त्यांना ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.





