पुढील 6 महिन्यात लाॅंच होऊ शकते Bajajची CNG बाईक; मिळणार अप्रतिम मायलेज..

Bajaj CNG Bike: बजाज ऑटो भारतीय बाजारपेठेसाठी सीएनजी बाइकचा पर्याय शोधत आहे. लोकांसाठी वाहन चालवण्याचा खर्च कमी करणे आणि प्रदूषण कमी करणे हा त्याचा उद्देश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बजाज आता सीएनजी-कम-पेट्रोल बाइकवर काम करत असून लवकरच ही सीएनजी बाईक लाॅंच होण्याची शक्यता आहे.
6 महिने ते 1 वर्षात लॉन्च होईल?
अहवालानुसार, जर सर्व काही योजनेनुसार झाले तर ते 6 महिने ते 1 वर्षाच्या आत बाजारात बजाजची सीएनजी बाईक येऊ शकते. काही प्रोटोटाइप युनिट्स आधीच बनवल्या गेल्या आहेत. ही 110 सीसीची बाइक असू शकते. सुरुवातीला कंपनीच्या औरंगाबाद येथील कंपनीत त्याचे उत्पादन करण्याचे नियोजन आहे आणि नंतर पंतनगर येथील कंपनीत उत्पादन करण्याचे बजाजचे नियोजन आहे.
CNG बाईकचे नाव काय असेल?
यासाठी प्लॅटिना ब्रँडच्या नावाचा विचार केला जात आहे. मात्र, बजाज ऑटोचे ईडी राकेश शर्मा यांनी याबाबतची माहिती देण्यास नकार दिला. परंतु, ते म्हणाले, “आम्हाला आमच्या पोर्टफोलिओमध्ये ‘स्वच्छ इंधन’ चा वाटा निश्चितपणे वाढवायचा आहे, ज्यात ईव्ही, इथेनॉल, एलपीजी आणि सीएनजीचा संपूर्ण स्पेक्ट्रम समाविष्ट आहे.”
राजीव बजाज यांचे वक्तव्य –
याशिवाय नुकतेच बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ‘कोणास ठाऊक, कदाचित सीएनजी बजाज मोटरसायकल लोकांच्या बाइक चालवण्याचा खर्च निम्मा करू शकते.’ त्यांनी सुचवले होते की सीएनजी मोटारसायकल 100-110 सीसी सेगमेंट लोकांना परवडणारी बनवू शकतात.





