बजाजने इतिहास रचला! ‘या’ जबरदस्त फीचर्ससह लाँच केली पहिली CNG बाइक

मुंबई : भारतीय कंपनी बजाज ऑटोने इतिहास रचत जगातली पहिली सीएनजी बाइक आज लॉन्च केली. बजाजने एकूण 3 मॉडेल लाँच केले आहे. हे तिन्ही मॉडेल हे बजेटमध्ये बसणार आहे. यामध्ये सर्वात कमी मॉडेलची किंमत 95 हजार रुपये आहे. गेल्या काही महिन्यांपासून ज्या बाइकची चर्चा सुरू होती अखेरीस ती बाईक आज लॉन्च झाली.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या गाडीचं लाँचिंग करण्यात आलं आहे. बजाज फ्रीडम सीएनजी असं या बाइकचं नाव आहे. या बाइकची किंमत 95,000 (Ex-sh) असणार आहे. एकूण अशी 3 मॉडेल आहे. यामध्ये फ्रीडम 125 NG04, फ्रीडम 125 NG04 ड्रम एलईडी, फ्रीडम 125 NG04 ड्रम अशी मॉडेल आहे. फ्रीडम 125 NG04 ची किंमतही 1 लाख 10 हजार असणार आहे. तर फ्रीडम 125 NG04 ड्रम एलईडी ची किंमत 1 लाख 5 हजार असणार आहे. तर फ्रीडम 125 NG04 ड्रमची किंमत 95 हजार असणार आहे.
काय आहेत या बाईकचे फीचर्स?
या बाइकमध्ये पाच लिटर पेट्रोल साठवण्याची क्षमता असलेली एक लहान फ्युएल टँक बाइकमध्ये आहे. बाइकच्या व्हीलबेसवर एक लांब सीट आहे आणि त्याखाली सीएनजी टँक बसवण्यात आली आहे. सीएनजी आणि पेट्रोल इंधनाची एकत्रित क्षमता असल्यामुळे ही गाडी पारंपरिक 125 सीसी बाइकप्रमाणे रेंज देते. बाइकच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास लार्ज साइड बॉडी पॅनेल, स्टायलिश बेली पॅन, स्प्लिट 5-स्पोक डिझाइन अलॉय व्हील्स, मागच्या सीटवरच्या प्रवाशासाठी फंक्शनल ग्रॅब रेल, रिब्ड सीट, ट्रॅडिशनल आरएसयू टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, रिअर मोनो-शॉक सेटअप, टायर हगर आणि मेगा कलर रेंज यांचा समावेश आहे. ही बाईक ग्राहकांच्या किती पसंतीस उतरेल हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





