Arvind Kejriwal : बेल की जेल? अरविंद केजरीवालांच्या याचिकेवर उद्या फैसला
Updated On:

Arvind Kejriwal – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर उद्या (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. त्या फैसल्यामुळे केजरीवाल यांना दिलासा मिळणार का ते स्पष्ट होईल.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी सर्वप्रथम ईडीने केजरीवाल यांना २१ मार्चला अटक केली. त्यानंतर घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने त्यांना २६ जूनला औपचारिकरित्या अटक केली.
ईडीशी संबंधित प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने याआधीच केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला. आता सीबीआय तपास करत असलेल्या प्रकरणी न्यायालय निर्णय जाहीर करेल. केजरीवाल यांनी स्वतंत्र याचिकेद्वारे सीबीआयने केलेल्या अटकेच्या कारवाईलाही आव्हान दिले आहे.





