इम्रान खान यांच्या पत्नी ‘बुशरा बिबी’ यांचा जामीन फेटाळला

Imran Khan | Bushra Bibi – पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी न्यायालयाने इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बिबी यांचा जामिनासाठीचा अर्ज फेटाळला आहे. पाकिस्तानात ९ मे रोजी झालेल्या दंगलीशी संबंधित १२ प्रकरणी हा जामीन नाकारण्यात आला आहे.
रावळपिंडीतील दहशतवाद विरोधी न्यायालयाने बुशरा बिबी यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणी सविस्तर तपास होण्याची गरज असल्याचे नमूद केले आणि त्यांना जामीन मंजूर करण्यास नकार दिला. बुशरा बिबी यांच्याशी संबंधित प्रकरणांचा तपास ७ दिवसात पूर्ण करण्यात यावा, असे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत.
इम्रान खान यांच्यासह बुशरा बिबी आणि पीटीआय पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांना ९ मे दंगली प्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. या दंगलीमध्ये १०० पेक्षा जास्त लोक ठार झाले होते.
खान यांना भ्रष्टाचार प्रकरणी अटक झाल्यानंतर पीटीआय समर्थकांनी लाहोरमधील पाकिस्तानी लष्कराच्या कॉर्प्स कमांडरच्या निवासस्थानासह रावळपिंडी येथील जनरल मुख्यालय. नागरी आणि लष्करी संस्थांना लक्ष्य केले होते.





