Bageshwar Dham। मध्य प्रदेशातील छतरपूर याठिकणी बागेश्वर धाममध्ये मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. याठिकाणी एका खाजगी ढाब्याची भिंत कोसळून एका भाविकाचा मृत्यू झाला आहे, तर १२ हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छतरपूरचे सीएमएचओ आरपी गुप्ता यांनी या दुर्घटनेविषयी माहिती दिली. त्यांनी याविषयी बोलताना, “आज सकाळी मुसळधार पावसामुळे ढाब्याची भिंत कोसळल्याने काही भाविक जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयात आणण्यात आले आहे. उपचार सुरू आहेत. १० जण जखमी आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे. १-२ जणांना गंभीर दुखापत झाली आहे” धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे भाविकांना आवाहन Bageshwar Dham। बागेश्वर धाममध्ये वाढत्या गर्दीमुळे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी भाविकांना आपापल्या घरी राहून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्याची विनंती केली आहे. बागेश्वर धाममध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त भाविकांची जास्त गर्दी आणि सततचा पाऊस पाहता, पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी भाविकांना विशेष आवाहन केले आहे. धीरेंद्र शास्त्री म्हणाले आहेत की दररोज लाखो लोक गुरुपौर्णिमा उत्सवात सहभागी होण्यासाठी येत आहेत. तथापि, पाऊस आणि प्रचंड गर्दीमुळे त्यांनी भाविकांना घरीच गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाचा उद्देश भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि धाममध्ये सुव्यवस्था राखणे आहे. Bageshwar Dham। हेही वाचा पाटण्यात एन्काऊंटर…! गोपाल खेमका हत्याकांडासाठी शस्त्रे पुरवणारा पोलिसांच्या चकमकीत ठार