Kedarnath Dham । काल (दि. 9) महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व महादेव भक्तांसाठी आनंदाची बातमी आली आहे. उत्तराखंडमधील बाबा केदारनाथ धाम दरबार उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरातील केदारनाथ धाम कपाट उघडण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 10 मे रोजी सकाळी 7 वाजता भाविकांना बाबा केदार यांचे दर्शन घेता येणार असल्याचं सांगितलं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या तारखेची घोषणा होताच बाबा केदार यांची पंचमुखी डोली गड्डीस्थल ओंकारेश्वर मंदिरातून 6 मे रोजी निघणार आहे. यानंतर 9 मे रोजी संध्याकाळी केदारनाथ धामला पोहोचेल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 मे रोजी केदारनाथ धामचे दरवाजे उघडले जातील. या दिवशी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडतील – । Badrinath Temple यावेळी 10 मे हा अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजेही उघडतात. यावेळी 12 मे रोजी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 6 वाजता बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांच्या उपस्थितीत पचकदार गड्डी स्थळ श्री ओंकारेश्वर मंदिर, उखीमठ येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमात दरवाजे उघडण्याची तारीख आज निश्चित करण्यात आली आहे. । Badrinath Temple