Badminton Asia Championships 2022 : सायनाची विजयी सलामी तर सेनला पराभवाचा धक्का
Updated On:

मनिला – भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू फुलराणी सायना नेहवाल हिने आशिया करंडक बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. तिने यंदाच्या मोसमात या स्पर्धेत थाटात प्रारंभ करत अपयशाची मालिका खंडित केली. मात्र, यंदाच्या मोसमात भरात असलेला लक्ष्य सेन मात्र पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतच गारद झाला. त्याच्यासह बी साई प्रणितलाही पराभवाचा धक्का बसला.
सायनाने दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त होत या स्पर्धेत सहभाग घेतला. तिने पहिल्या फेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या सीम युजीनवर 21-15, 17-21, 21-13 अशी तीन गेममध्ये मात केली व दुसरी फेरी गाठली.
लक्ष्य सेनला चीनच्या ली शे फेंगकडून 21-12, 10-21, 19-21 असा पराभव पत्करावा लागला. बी साईप्रणितचा इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तिनने 21-17, 21-13 असा पराभव केला.




