Badlapur sexual case : बदलापूर प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष आणि सचिव दोघांना जामीन मंजूर; पण जेलमधला मुक्काम अजूनही कायम, कोर्टाने थेट सांगितलं….

Badlapur sexual case | Akshay Shinde – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपींना वाचवले जात असून पोलिसांकडून संस्थाचलकांना अद्याप अटक झाली नसल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या वकिलांनी केला होता. तसेच शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब करून पुरावे देखील नष्ट केले असल्याचे वकील अमित कटारनवरे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणातील खऱ्या आरोपींना अटक व्हावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
शाळेमध्ये घडलेली घटना पोलिसांपर्यंत शाळा व्यवस्थापनाने पोहोचवली नाही तसेच सीसीटीव्ही फुटेज गायब आहेत. पुरावे नष्ट करण्याचे कलम शाळा व्यवस्थापनावर लावण्यात आलेले नाहीत. तसेच पोलिसांनी अद्याप फरार शाळा व्यवस्थापनातील आरोपींना पकलडे नाही, असा आरोप वकील कटारनवरे यांनी केला होता.
त्यानंतर गेल्या दीड महिन्यांपासून फरार असलेले सहआरोपी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना काल पोलिसांनी अटक केली. या दोन्ही आरोपींना आज कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टात युक्तिवाद झाला. यावेळी कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत एका प्रकरणात जामीन मंजूर केला.
तर दुसऱ्या एका प्रकरणात कोर्टाने आरोपींना अटक करण्यासाठी परवानगी दिली. दरम्यान कोर्टाने दोन्ही आरोपींना 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. तर दुसऱ्या एका गुन्ह्यात कोर्टात पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करण्यासाठी परवानगी मागितली.
कोर्टाने यावेळी पोलिसांची भूमिका ऐकून अटकेसाठी परवानगी दिली. यावेळी कोर्टाने त्यांना एका प्रकरणात जामीन मंजूर केला. पण तरीही त्यांची रवानगी जेलमध्येच करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना दिवसांची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे.





