badlapur school case: ‘बदलापुर घटनेवरून आंदोलने हा सामाजिक आक्रोश’ – जितेंद्र आव्हाड
Updated On:

badlapur school case | Jitendra Awad – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पाश्र्वभूमीवर ठिकठिकाणी जी निदर्शने आणि संताप व्यक्त केला जात आहे तो एक सामाजिक आक्रोश असून ती आंदोलने राजकीय हेतूने प्रेरीत नाहीत असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एससीपी) नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
बदलापूर आणि संपूर्ण महाराष्ट्रात घडलेल्या बलात्काराच्या घटना, त्यामुळे लोकांच्या मनात जो राग आहे, तो राजकीय आक्रोश नसून सामाजिक आक्रोश आहे. लोक रस्त्यावर उतरत आहेत, असे आव्हाड यांनीआज येथे पत्रकारांशी बोलतानासांगितले.
ते म्हणाले कीहा प्रकार दडपण्याचा जो प्रयत्न झाला त्यातून लोकांमध्ये संताप निर्माण झाला. बदलापुरला त्याच्या विरोधात सामान्य नागरीक रस्त्यावर उतरले. त्यांना महिला व मुलींची सुरक्षा हा महत्वाचा विषय वाटतो असे त्यांनी नमूद केले.





