Badlapur Accident : धक्कादायक ! बदलापूरमध्ये भीषण अपघात; भरधाव ट्रकची डंपरला धडक

बदलापूर : आपली एक चूक आपल्याला किती महागात पडू शकते याचा प्रत्यय आज बदलापूरमध्ये आला. याठिकाणी एका रिक्षा चालकाच्या चुकीमुळे एका भरधाव ट्रकची डंपरला धडक बसली.रिक्षाचालकाने पलिकडे जाण्यासाठी रिक्षा वळवली त्याच रस्त्यावरुन मागून एक डंपर येत होता. रिक्षाला वाचवण्यासाठी डंपरने ब्रेक मारला पण पाठीमागून येणाऱ्या ट्रकने डंपरने जोरदार धडक मारली. यात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
काय घडले नेमके?
बदलापूर शहरातील कात्रप परिसरात दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. यावेळी कल्याण-कर्जत महामार्गावरुन ट्रक आणि डंपर कर्जतच्या दिशेने निघाला होता. एका रिक्षाचालकाने अचानक रस्ता बदलून पलिकडे जाण्यासाठी अचानक रिक्षा वळवली आणि डंपरच्या समोर नेली. रिक्षाला वाचवण्यासाठी डंपरने जोरात ब्रेक दाबला. पण यात डंपरच्या पाठीमागून आलेल्या ट्रकने डंपरला जोरदार धडक मारली.
या धडकेत ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र ट्रकचे मोठ्या प्रामाणात नुकसान झाले आहे. ट्रकचा पुढचा भाग खराब झाला. समोरच्या काचांचा चुराडा झाला. बाजूचे दरवाजे देखील खराब झाले आहेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही हे नशीब…





