पिंपरी | दिव्यांग भवन फाऊंडेशनकडून बोधचिन्ह व घोषवाक्य स्पर्धा

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका दिव्यांग भवन फाऊंडेशन हे सर्व दिव्यांग व्यक्तींच्या थेरपी, दिव्यांगांचे पुनर्वसन करण्यासाठी व त्यांच्यामध्ये कौशल्य आणि सक्षमीकरण करण्यासाठी कार्यरत आहे. फाऊंडेशनकडून बोधचिन्ह व घोषवाक्य निश्चित करण्यासाठी स्पर्धा घेण्यात येत आहे.
दिव्यांग भवन फाऊंडेशनसाठी लोगो (बोधचिन्ह) व टॅगलाईन (घोषवाक्य मराठी व इंग्रजी मध्ये) निश्चित करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून विजेत्या स्पर्धकास आकर्षक बक्षीसे जिंकण्याची संधी आहे.
लोगो (बोधचिन्ह) स्पर्धा विजेत्यास ५०,००० रुपये, घोषवाक्य (मराठी) स्पर्धा विजेत्यास २५,००० व घोषवाक्य (इंग्रजी) स्पर्धा विजेत्यास २५,००० रुपये देण्यात येणार आहेत. दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडून या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी pcmcdivyangbhavan.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





