बडे मिया छोटे मियाचा येणार रिमेक…अक्षय कुमार टायगर श्रॉफसोबत झळकणार मनुषी छिल्लर

मुंबई – ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा या अभिनेत्रींनप्रमाणे मिस युनिव्हर्सचा खिताब पटकावल्यानंतर अभिनेत्री मनुषी छिल्लर देखील बॉलिवूड चित्रपटामध्ये झळकली. अभिनेता अक्षय कुमारसोबत मनुषीने पृथ्वीराज या चित्रपटात काम केले. आता मनुषी पुन्हा एकदा अक्षय कुमारसोबत एका चित्रपटात दिसणार आहे.
अक्षय कुमार टायगर श्रॉफसह अली अब्बास दिग्दर्शित बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटात झळकणार आहे. 90 च्या दशकातील हिट चित्रपटाचा हा सिनेमा रिमेक असणार आहे, ज्यामध्ये अक्षय आणि टायगर व्यतिरिक्त मनुषी देखील दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती वाशू आणि जॅकी भगनानी करणार आहेत. चित्रपटात धमाकेदार ऍक्शन असल्यामुळे हॉलिवूडमधील ऍक्शन तंत्रज्ञान यासाठी वापरले जाणार आहे. 2023 मध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात येणार आहे.
‘बडे मियाँ छोटे मियाँ’चे शूटिंग अनेक आंतरराष्ट्रीय लोकेशन्सवर केले जाणार आहे, यामुळे परदेशी ठिकाणांची दृश्येही चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. अक्षय कुमारचे व्यस्त शेड्युल पाहता सर्व काही ठरलेल्या वेळेत झाले तर हा चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित होईल अशी आशा निर्मात्यांना आहे.




