बच्चू कडू यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Bachchu Kadu And Sharad Pawar| प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी पुण्यातील मोदी बागेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. मागील काही दिवसांपासून बच्चू कडू आणि महायुती यांच्यात धुसफूस चालू आहे. त्यापार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी शरद पवारांची घेतलेल्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार यांच्या भेटीआधी बच्चू कडू यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तेव्हा ते म्हणाले, “शरद पवार यांची भेट आधीच ठरलेली होती. त्याप्रमाणे मी त्यांना भेटायला आलो आहे. काही मुद्द्यावर चर्चा करायची आहे. शेतकरी, मजुरांचे, अंपगाचे प्रश्न महत्वाचे आहेत. त्यासाठी मी काहीही निर्णय घेऊ शकतो. हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला 1 सप्टेंबरपर्यंत वेळ दिली आहे. त्यानंतर मी माझा पुढचा निर्णय घेईल.”
पुढे ते म्हणाले, “आम्ही काल जे मुद्दे मांडले त्यावर चर्चा मी शरद पवारांशी करणार आहे. 1 सप्टेंबर पर्यंत महायुतीला वेळ दिला आहे. त्यांच्यासोबत बाकी पक्ष या मुद्द्यांवर चर्चा करतील आणि त्यांचे मत सांगतील, त्यासाठी शरद पवारांची भेट घेत आहे,” असं यावेळी त्यांनी म्हटले आहे.
बच्चू कडू महायुतीवर नाराज असल्याची चर्चा
दरम्यान, बच्चू कडू हे महायुतीवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांनी वेळोवेळी महायुती विरोधात वक्तव्य केली आहेत. त्यामुळे ते महाविकास आघाडीमध्ये सहभागी होतील असं बोललं जातं. त्याबाबत विचारले असता बच्चू कडू यांनी मी कोणावरती नाराज नाही. राणा दाम्पत्यासोबत असलेल्या वादाचा येथे काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. Bachchu Kadu And Sharad Pawar|
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या अमरावतीच्या उमेदवाराला थेट विरोध केला आणि आपल्या प्रहार संघटनेच्या वतीने आपला उमेदवार उभा केला होता. तेव्हापासून बच्चू कडू यांची महायुतीवरील नाराजी दिसून आली आहे. यातच आता त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. Bachchu Kadu And Sharad Pawar|
हेही वाचा:





